• Download App
    ओबीसींच्या आरक्षणासाठी महादेव जानकर आक्रमक; रविवारी राज्यभरात करणार चक्काजाम । RSP Leader Mahadev Jankar Called Chakkajam Agitation On Sunday Over OBC Reservation

    OBC Reservation : ओबीसींच्या आरक्षणासाठी महादेव जानकर आक्रमक; रविवारी राज्यभरात करणार चक्काजाम

    OBC Reservation : राज्यात मराठा आरक्षणाबरोबरच ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दाही तापलेला आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपने संपूर्ण राज्यभरात जेलभरो आंदोलन केले होते. आता भाजपचा मित्र पक्ष असलेल्या रासपने ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून रान पेटवण्याचे ठरवले आहे. रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी रविवारी राज्यभरात चक्का जाम आंदोलनाची घोषणा केली आहे. RSP Leader Mahadev Jankar Called Chakkajam Agitation On Sunday Over OBC Reservation


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाबरोबरच ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दाही तापलेला आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपने संपूर्ण राज्यभरात जेलभरो आंदोलन केले होते. आता भाजपचा मित्र पक्ष असलेल्या रासपने ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून रान पेटवण्याचे ठरवले आहे. रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी रविवारी राज्यभरात चक्का जाम आंदोलनाची घोषणा केली आहे.

    रासप नेते महादेव जानकर पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, रविवारी ओबीसी आरक्षणासाठी राज्यभरात चक्काजाम आंदोलन करण्यात येईल. राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते संपूर्ण राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करतील. ओबीसींना लवकरात लवकर आरक्षण देण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार असून आंदोलनाद्वारे सरकारचे लक्ष वेधून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    दरम्यान, रविवारी चक्काजाम आंदोलनात स्वत: जानकरही सहभागी असतील. त्यांनी स्वत: मुंबईतील मानखुर्दमध्ये शेकडो कार्यकर्त्यांसह चक्काजाम आंदोलन करणार असल्याचं सांगितलं.

    RSP Leader Mahadev Jankar Called Chakkajam Agitation On Sunday Over OBC Reservation

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य