महाराष्ट्र सायबर सेलचे विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांच्याकडे तक्रार दाखल
मुंबई : दिवसेंदिवस सायबर गुन्हेगारीची प्रकरणं वाढताना दिसत आहे. सायबर सेल ही गुन्हेगारी रोखण्यासाठी अटोकाट प्रयत्न करत आहे, मात्र तरीही दररोज नवनवीन प्रकार समोर येत आहेत. आता नुकतंच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याबद्दलही असाच प्रकार घडल्याचे समोर आले आहे. Roopli Chakankars photo uploaded on that offensive Facebook page Complain to Cyber Cell
रूपली चाकणकर यांचा फोटो फेसबुकवरील एका अश्लील पेजवर अपलोड करण्यात आला होता. या पेजवर अन्य महिलांचे अर्धनगग्न अवस्थेतील फोटो आणि व्हिडीओ आढळून आले आहे. देसी ब्युटी असे या फेसबुक पेजचे नाव आहे. याच पेजवर चार दिवसांपूर्वी कुणीतरी अज्ञाताने रुपाली चाकणकरांचाही फोटो अपलोड केला होता.
हा प्रकार लक्षात येतात रुपाली चाकणकरणांनी महाराष्ट्र सायबर सेलचे विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांच्याकडे यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. रूपाली चाकणकरांचा फोटो कोणी अपलोड केला याचा शोध घेण्याचे काम सायबर सेलचे पोलीस करत आहेत.
Roopli Chakankars photo uploaded on that offensive Facebook page Complain to Cyber Cell
महत्वाच्या बातम्या
- आयपीएल चॅम्पियन चेन्नईवर पैशांचा पाऊस, गुजरातलाही मिळाले कोट्यवधी, पाहा पुरस्कारांची संपूर्ण यादी
- कर्नाटक विजयाची डोक्यात गेली हवा; मध्य प्रदेशात काँग्रेसला हव्यात 150 जागा!!
- हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये अमित शाह दाखल; मुख्यमंत्री एन बिरेन सिंह आणि अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक!
- उत्तरप्रदेश विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत भाजपाचा दोन्ही जागांवर विजय!