• Download App
    पवित्र भीमाशंकरचा खडबडीत मार्ग आता चकाचक राष्ट्रीय महामार्ग होणार; गडकरींची घोषणा Road to pious Bhima Shankar will now become National Highway

    पवित्र भीमाशंकरचा खडबडीत मार्ग आता चकाचक राष्ट्रीय महामार्ग होणार; गडकरींची घोषणा

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : महाराष्ट्रातील पवित्र बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले श्री क्षेत्र भीमाशंकर येथे देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांसाठी व पर्यटकांसाठी सोयीसुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने या तीर्थक्षेत्रास जोडणाऱ्या खेड – भीमाशंकर या राज्य मार्ग रस्त्यास राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या वतीने घेण्यात आला आहे. ही माहिती केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. श्रावणातील पहिल्या सोमवारचा मूहूर्त गाठून ही घोषणा झाली आहे. Road to pious Bhima Shankar will now become National Highway


    Nitin Gadkari ! नाशिक-पुणे महामार्गाबाबत नितीन गडकरींची मोठी घोषणा


    एकूण ७० किमी लांबीच्या या महामार्गामुळे राजगुरूनगर (खेड), चास, वाडा, तळेघर ही काही महत्त्वाची शहरे जोडली जाणार असून या महामार्गामुळे भीमाशंकरला येणाऱ्या भाविकांसाठी दळणवळण सोयीचे होईल. भीमाशंकर व माळशेज घाट हे पर्यटन वर्तुळ शक्य होईल, तसेच भीमाशंकर परिसरातील शेतीमाल मुंबई बंदराकडे पोहोचवणे सुलभ होईल. या महामार्गामुळे परिसरातील वाहतुक सुरळीत होईल व परिसराचा शैक्षणिक व औद्योगिक विकास साधण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले.

    पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या कार्यकुशल नेतृत्वाखाली देशभरात सर्वदूर राष्ट्रीय महामार्गांचे जाळे विणून देशातील तीर्थक्षेत्रांचा व पर्यटन क्षेत्रांचा विकास साधण्यासाठी आमचे प्रयत्न चालू असल्याचे त्यांनी सांगितले.

    Road to pious Bhima Shankar will now become National Highway

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार