आयपीएल क्रिकेट स्पर्धेत उत्तम फलंदाजी करणारा चेन्नई सुपर किंग्जचा शिलेदार ऋतूराज गायकवाड याचा मोलाचा वाटा आहे.Rituraj Gaikwad, a stonemason of Csk, arrives at his home in Pune
विशेष प्रतिनिधी
पुणे : नुकत्याच झालेल्या IPL मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज संघाने यंदा आयपीएल चषकावर आपले नाव कोरले आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत उत्तम फलंदाजी करणारा चेन्नई सुपर किंग्जचा शिलेदार ऋतूराज गायकवाड याचा मोलाचा वाटा आहे.
ऋतूराज चे रविवारी सकाळी जुनी सांगवीतील घरी आगमन होताच फटाक्यांच्या आतिषबाजीत व शुभेच्छांच्या वर्षावाने स्वागत करण्यात आले.
आपल्या कारमधून ऋतुराज कॉलनीत पोहोचताच मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. त्यानंतर त्याच्या आईने त्याची आरती केली. तसेच फुले उधळून त्याचे जंगी स्वागत करण्यात आले.
ऋतुराजाच्या घराबाहेर आकर्षक फुग्यांची सजावटही केली होती. ऋतुराज घराबाहेर येताच भारतीय संस्कृतीप्रमाणे कुटुंबीयांनी त्याचे औक्षणही केले.तसेच काल आयपीएल क्रिकेट स्पर्धेत ऋतूराज गायकवाड याच्या कामगिरी बद्दल पुणेकरांनी फटाके फोडून व पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला होता.ऋतुराज पुण्यातील जुनी सांगवीतील मधुबन सोसायटीत राहतो.
Rituraj Gaikwad, a stonemason of Csk, arrives at his home in Pune
महत्त्वाच्या बातम्या
- परतीच्या पावसामुळे कांद्याच्या किंमतीत वाढ?
- Aryan Khan Drugs Case : ड्रग्जप्रकरणी असदुद्दीन ओवैसी म्हणतात- ज्यांचा बाप ताकदवान त्यांच्यासाठी आवाज उठवणार नाही!
- सरदार उधम सिंग मुव्ही रिव्ह्यू
- Target Killing : काश्मिरात दहशतवाद्यांचे पुन्हा भ्याड कृत्य, कुलगाममध्ये तीन परप्रांतीयांवर गोळीबार, दोन जणांचा मृत्यू