प्रतिनिधी
मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत संशयास्पद मृत्यू प्रकरणात थेट लोकसभेत ए. यू. अर्थात आदित्य उद्धव ठाकरे यांचे नाव निघाल्यानंतर या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे ए. यू. यांच्या नंबरवरून रिया चक्रवर्तीला 44 फोन कॉल केल्याचा खुलासा बिहार पोलिसांनी केला. हे ए. यू. म्हणजे आदित्य ठाकरे असा खळबळजनक आरोप शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. Rhea Chakraborty again revealed through her lawyer that she does not know Aditya Thackeray
त्याचबरोबर त्याचे पडसाद बॉलिवूडमध्ये उमटले आहेत. आदित्य ठाकरे यांच्या संदर्भात राहुल शेवाळे यांनी आरोप करताच आणि त्यामध्ये रिया चक्रवर्तीचे नाव येताच रिया चक्रवर्ती हिने ताबडतोब आपल्या वकिलामार्फत आदित्य ठाकरे यांना ओळखत नसल्याचा खुलासा पुन्हा केला आहे.
सुशांतच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचे राजकारण होत असल्याचे रियाच्या वकिलांनी म्हटले आहे. रिया आणि आदित्य ठाकरे दोघे कधीही भेटले नाहीत. रियाला शिवसेनेच्या नेत्यांबद्दल फक्त ऐकीव माहिती आहे. पण ती आदित्य ठाकरे यांना कधीही भेटली नाही. अनेक राजकीय नेते याचा गैरफायदा उचलू पाहत आहेत. या विषयात राजकारण होत आहे.
आरोप निरर्थक : रियाचे स्टेटमेंट
रियाच्या वकिलांनी त्यावेळी पण स्पष्ट केले होते की, रिया विरोधात पोलिस आणि ईडीच्या चौकशीत काहीही मिळाले नाही. त्यामुळे सुशांतच्या कुटुंबीयांनी केलेले आरोप निरर्थक आहेत. त्यांच्या बोलण्यात कोणतंही तथ्य नसून मनाला येईल तसे आरोप ते करत आहेत.
बिहार पोलिसांचा एफआयआर राजकीयदृष्टीने
बिहार पोलिसांचा एफआयआर राजकीयदृष्टीने तयार करण्यात आला आहे. त्यामुळे रिया बेकायदेशीर तपासणीचा भाग होऊ शकत नाही. ती ईडी तपासणीत सहकार्य करत आहे. मुंबई पोलिस आणि ईडी या दोघांनाही रियाची सर्व आर्थिक कागदपत्रं सोपविण्यात आली आहेत. या कागदपत्रातून तिच्यावर झालेले आरोप खोटे असल्याचे स्पष्ट करतात.
एक रुपयाही ट्रान्सफर केला नाही
रियाच्या खात्यांसह इनकम टॅक्स रिटर्नची तपासणी ईडीने केली आहे. या तपासणीत त्यांना रियाविरुद्ध कोणताही पुरावा मिळाला नाही. रियाने सुशांतच्या खात्यातून एक रुपयाही ट्रान्सफर केला नाही. त्याच्या सर्व इनकम टॅक्स रिटर्न्सची चौकशी पोलिस आणि ईडीने केली आहे. रिया आणि सुशांतच्या कुटुंबीयांचे संबंध आधीपासूनच चांगले नव्हते. रियाच्या स्टेटमेन्टमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, रियाला या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी याबाबत कोणतीही अडचण नाही.
Rhea Chakraborty again revealed through her lawyer that she does not know Aditya Thackeray
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रात डाॅक्टर, तंत्रज्ञांच्या 4500 जागांची भरती; वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजनांची विधानसभेत माहिती
- चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा प्रचंड उद्रेक, पण भारतात स्थिती नियंत्रणात; डॉ. रणदीप गुलेरियांचा विश्वास
- महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायतींमध्ये काँग्रेस – राष्ट्रवादी हरलेत, तर महापालिका, झेडपी निवडणुकांमध्ये काय होईल??
- महाराष्ट्रातल्या गावांचा कल हिंदुत्ववादी पक्षांकडेच; काँग्रेस – राष्ट्रवादी पेक्षा भाजप आणि दोन्ही शिवसेना यांची दुप्पट ग्रामपंचायतींवर सत्ता