वृत्तसंस्था
पुणे : पुण्यात कोरोनाचे निर्बंध आणखी शिथिल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबतचे संकेत खुद्द अजित पवार यांनी दिले आहेत.Restrictions in Pune relaxed from October; Guardian Minister Ajit Pawar’s Hint after corona review
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना सुरू असताना लसीकरण वेगाने होत आहे. त्यामुळे या संकटावर नियंत्रण मिळण्याचा विश्वास वाढत आहे. रुग्णसंख्या आटोक्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आता पुण्यात निर्बंध अजून शिथिल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याचे संकेत दिले आहेत. पुणे शहर, ग्रामीण आणि पिंपरी-चिंचवडमधील करोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी याबाबत माहिती दिली.राज्य सरकारने ४ ऑक्टोबरला राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
या निर्णयाविषयी अजित पवार म्हणाले. “ऑनलाईन शाळा घेतल्यामुळे खूप मर्यादा येत होत्या. शेवटी शाळेतले वातावरण, मुलांनी एकत्र बसणे हा अनुभव महत्त्वाचा असतो. त्यासाठी शाळा सुरू करण्याचा निर्णय झालेला आहे.”
१ ऑक्टोबरला महत्त्वपूर्ण बैठक
“पुणे जिल्हा, शहर आणि पिंपरी चिंचवडची परिस्थिती बरी आहे. काही महत्त्वाच्या निर्णयांबाबत १ ऑक्टोबरला बैठक होईल नियमांमध्ये शिथिलता देता येईल, याबाबत आमदार, खासदार, अधिकारी मिळून निर्णय घेणार आहोत”, असे ते म्हणाले.
स्विमिंग पूलच्या नियमात शिथिलता
“स्विमिंग पूलबाबत आपण खेळाडूंना परवानगी दिली होती. आता दोन्ही डोस झालेल्या सामान्य नागरिकांनाही परवानगी देण्यात आली आहे,असे पवार म्हणाले.
Restrictions in Pune relaxed from October; Guardian Minister Ajit Pawar’s Hint after corona review
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्राचा मनोज विष्णू गुंजाळ ठरला यंदाच्या राष्ट्रीय सेवा पुरस्काराचा मानकरी
- UPSC Results : 761 विद्यार्थी उत्तीर्ण, शुभम कुमार प्रथम, दुसऱ्या क्रमांकावर जागृती अवस्थी, असा चेक करा निकाल
- कॅमिला कॅबेलो, लिओनार्डो डिकॅप्रियो, लेडी गागा यांनी हवामान बदलावरील बिल पास करण्यासाठी अमेरीकन काँग्रेसकडे केली मागणी
- झळ धर्मांतराची : कर्नाटकच्या हिंदू आमदाराने सांगितली व्यथा, आईने स्वीकारला ख्रिश्चन धर्म, हिलिंगच्या नावाखाली मिशनऱ्यांकडून खेडुतांचे मोठ्या प्रमाणात धर्मांतर सुरू!