विशेष प्रतिनिधी
मुंबई : प्रख्यात लेखिका अमृता शेरगिल यांच्या एका चित्राला विक्रमी किंमत मिळाली आहे. शेरगील यांचे 1938 मधील ‘इन द लेडीज एनक्लोजर’ हे पेंटींग मुंबई येथील सैफ्रोनार्ट द्वारा तब्बल 37.8 कोटी रुपये (5.14 मिलियन अमेरिकी डॉलर) किंमतीला विकले गेले आहे.Renowned painter Amrita Shergill’s painting sells for Rs 37.8 crore
मंगळवारी पार पडलेल्या लिलावात एका कलाकाराने विक्रमी बोली लावून हे चित्र विकत घेतले. व्ही एस गायतोंडे यांचे शिर्षकहीन-1961 नंतर जागतिक स्तरावर विक्री झालेले हे दुसरे सर्वात महागडी कलाकृती आहे. याच वर्षी मार्च महिन्यात 39.98 कोटी रुपयांना विकले गेले होते.
अमृता शेरगिल या एक हंगेरियन-भारतीय चित्रकार होत्या. नवी दिल्ली येथे राष्ट्रीय गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट येथे त्यांच्या कलाकृतीचा एक मोठा संग्रहही आहे. सॅफ्रोनार्टचे सीईओ आणि सहसंस्थापक दिनेश वजीरानी यांनी माहिती देताना सांगितले की, अमृता शेर गिल यांची 1938 पासून ‘इन द लेडीज एनक्लोजर’ शिर्षकाची सेमिनल पेंटींग्जची विक्रमी विक्री ही त्यांच्या अत्युच्च कलाकृतीची ओळख पटवून देते.
वजीराणी यांनी सांगितले की, हे काम एक कलाकार म्हणून त्यांच्या कलाकृतीला पुढे आणते. याशिवाय त्यांच्या चित्राला मिळालेली किंमत पाहता त्यांनी कलेच्या क्षेत्रात आणखी एक नवे स्थान पादाक्रांत केले आहे. अमृता शेरगिल यांची कलाकृती नेहमीच अनेकांना प्रोत्साहन देत राहील असे वजीराणी यांनी सांगितले.
अमृता शेरगिल यांचा जन्म हंगेरीतील बुडापेस्ट येथे झाला. त्यांचेवडील उमराव सिंह शेरगिल हे संस्कृत-फारसीचे विद्वान आणि उच्च सरकारी अधिकारी होते; तर आई मेरी गोट्समन ही हंगेरीतील ज्यू आॅपेरा गायिका होती. अमृता कला, संगीत व अभिनय यांची उत्तम जाणकार होती.
वयाच्या आठव्या वर्षी तिला उत्तम पियानोवादन येत होते. विसाव्या शतकातील या प्रतिभावान कलाकतीर्चा समावेश भारतीय पुरातात्विक सर्वेक्षण खात्याने १९७६ आणि १९७९ मध्ये भारतातील नऊ सर्वश्रेष्ठ कलाकारांमध्ये केला आहे.
त्यांची चित्रेही त्याकाळातील अतिशय महागडी चित्रे होती. शाळेत असताना वर्गात तिने ‘नग्नचित्र’ (न्यूड) रेखाटल्यामुळे तिची हकालपट्टी करण्यात आली. तिचे कलागुण पाहून तिच्या आई-वडिलांनी तिला फ्लॉरेन्स, इटली येथे कला शिक्षणासाठी दाखल केले.
Renowned painter Amrita Shergill’s painting sells for Rs 37.8 crore
महत्त्वाच्या बातम्या
- ‘छोट्या माणसा’ला शरद पवारांनी घरी बोलावलेच नाही, नाना पटोले यांनी केला खुलासा
- श्रीनगरच्या गुपकार चौकात डौलात फडकला तिरंगा…!!
- ख्रिश्चन धर्मियांच्या भावना दुखावल्याप्रकरणी अभिनेत्री करिना कपूरविरुध्द तक्रार, गुन्हा दाखल करण्याची मागणी
- रेल्वे स्टेशन की विमानतळ, गुजरातमधील गांधीनगर स्टेशनवर चक्क फाईव्ह स्टार हॉटेल