• Download App
    खुलासा व दिलगिरी : नितीन गडकरी यांना व्यक्तिगत लक्ष्य करण्याचा 'द फोकस इंडिया'चा हेतू नाही!Regret & Explanation : Not personal targeting to Nitin Gadkari

    खुलासा व दिलगिरी : नितीन गडकरी यांना व्यक्तिगत लक्ष्य करण्याचा ‘द फोकस इंडिया’चा हेतू नाही!

    “केंद्रीय मंत्री रस्ते वाहतूक मंत्री श्री नितीन गडकरी यांना गेल्या काही दिवसांपासून मीडियातून वेगवेगळ्या पद्धतीने टार्गेट केले जात आहे. सरकारी अथवा विविध प्रकारच्या सार्वजनिक व्यासपीठांवरून श्री गडकरी हे विविध विषयांवर जे भाष्य करत आहेत, त्याचे रिपोर्टिंग प्रसार माध्यमे जाणीवपूर्वक वेगवेगळ्या पद्धतीने करताना दिसत आहेत. Regret & Explanation : Not personal targeting to Nitin Gadkari

    त्यातही श्री गडकरी यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याशी राजकीयदृष्ट्या मतभेद असल्याचे माध्यमांमधून दाखवले जात आहे. स्वतः श्री गडकरींनी अनेक वेळा या संदर्भातले खुलासे केले आहेत. आपली भाषणे प्रसार माध्यमांमध्ये वेगळे हेतूने आणि तोडून मोडून प्रसिद्ध केली जातात. काही क्लिप संदर्भहीन करून दाखवल्या जातात, असे त्यांनी आधीच स्पष्ट केले आहे. तरीही देखील तशाच स्वरूपाच्या बातम्या येत आहेत. असे असताना केवळ प्रसार माध्यमांमधील बातम्यांवरून काही विश्लेषण केले जात आहे.

    यामध्ये श्री गडकरी यांच्याबद्दल ‘फोकस इंडिया’तही काही बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यातील काही बातम्यांत अस्वीकारार्य भाषा वापरली असल्याचे दिसते. त्यातून त्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य करण्याचा कोणताही हेतू व्यवस्थापनाचा नाही. त्यामुळे हा खुलासा करीत आहोत. आम्ही त्यांची मनापासून दिलगिरी व्यक्त करीत आहोत!”

    : संपादक,
    ‘द फोकस इंडिया’

    Related posts

    कर्नाटकच्या काँग्रेस सरकारची “कमाल”; 613 कोटींच्या भाड्याच्या यांत्रिक झाडूंनी बंगलोरचे रस्ते झाडणार!!

    Mehbooba Mufti : मेहबूबा म्हणाल्या- लाल किल्ल्यासमोर काश्मिरी समस्यांचे पडसाद; सरकारचे जम्मू-काश्मीर सुरक्षित ठेवण्याचे आश्वासन, पण दिल्लीच धोक्यात

    India US : टॅरिफनंतर भारत-अमेरिका यांच्यात पहिला करार; भारत आपल्या गरजेच्या 10% गॅस अमेरिकेकडून खरेदी करणार