सलुन मध्ये एका तरुणीशी ओळख झालेल्या रिअल इस्टेट व्यवसायिकाला दाेन तरुणींनी हनी ट्रॅप मध्ये अडकवून त्यास ब्लॅकमेल करत मागील सहा महिन्यात सुमारे ४४ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
विशेष प्रतिनिधी
पुणे – सलुन मध्ये एका तरुणीशी ओळख झालेल्या रिअल इस्टेट व्यवसायिकाला दाेन तरुणींनी हनी ट्रॅप मध्ये अडकवून त्यास ब्लॅकमेल करत मागील सहा महिन्यात सुमारे ४४ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विमाननगर पाेलीसांनी वर्षा काेंडीबा जाधव (वय-२९) या तरुणीला अटक केली असून तिच्या १९ वर्षीय बहिण पाैर्णिमा काेंडिबा जाधव व अाकाश काेकरे या आराेपींवर ही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Real estate agent cheated ४४ lakhs rupees in honey trap by two girls in vimannagar area
याबाबत विमाननगर परिसरात राहणाऱ्या ३८ वर्षीय इसमाने विमानतळ पाेलीस ठाण्यात संबंधित तरुणीं विराेधात तक्रार दाखल केली आहे. राहुल (नाव बदलले आहे) सप्टेंबर २०२१ मध्ये राहुल हा विमाननगर परिसरातील राेहन मिथीला साेसायटीत पुर्वीका सलून याठिकाणी गेला हाेता. त्याठिकाणी त्याची सलून मध्ये वर्षा जाधव या तरुणीशी ओळख झाली.
एकमेकांचे माेबाईल क्रमांकावरुन त्यांचे चॅटिंग, बाेलणे सुरु झाल्यानंतर तरुणीने सुरुवातीला त्याच्याशी ओळख वाढवुन प्रेमाचा बहाणा करत त्याच्याकडून सुरुवातीला सलुनच्या कामासाठी चार लाख रुपये उसने घेतले. त्यानंतर व्यवसायिकाशी आणखी ओळ वाढवुन त्याच्याशी जबरदस्तीने संबंध ठेवण्याचा प्रयत्न करुन त्याला वेळाेवेळी ब्लॅकमेल करुन पाेलीसांकडे तक्रार करण्याची धमकी देवुन पैशांची मागणी करत
त्याच्याकडून १९ लाख ५५ हजार रुपये खंडणीच्या स्वरुपात व फसवणुक करुन स्विकारले. त्यानंतर त्यास लग्नाचे अमिष दाखवून त्याच्याकडून २४ लाख २९ हजार रुपयांचे साेने खंडणीच्या स्वरुपात घेऊन त्याची फसवणुक केली. मात्र, त्यानंतरही आराेपी तरुणीने व्यवसायिकाच्या मालकीचा फ्लॅट, दुकान नावावर करुन दे असे म्हणत त्याच्या पाठीमागे तगादा लावला. अखेर सततच्या त्रासाला कंटाळून त्याने पाेलीस ठाण्यात धाव घेत संबंधित तरुणीं विराेधात गुन्हा दाखल केला आहे.
Real estate agent cheated ४४ lakhs rupees in honey trap by two girls in vimannagar area
महत्त्वाच्या बातम्या
- चीनमधील शांघाय शहरात कोरोनाची नवी लाट; पहिल्यांदा तीन जणांचा मृत्यू झाल्याने घबराट
- खजुराहो ते दिल्ली दरम्यान लवकरच धावणार वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन : रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
- महाराष्ट्रात फेक न्यूजचे षडयंत्र : आधी अनिल देशमुख यांची संपत्ती “सोडवली”; आता राज्यपालांनी 12 आमदार यांची शिफारस केली!!
- Thackeray – Sule : महाराष्ट्रात शिवीगाळीनंतर गाजू लागलेय सोय – सुपारी – चांदीचे ताट…!!