विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुदत संपलेल्या महानगरपालिकांच्या प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश नगर विकास विभागाने दिले आहेत. पूर्वीच्या प्रभाग रचना रद्द करुन निवडणुकांचे सर्वाधिकार राज्य शासनाने स्वत:कडे घेतल्यानंतरची ही हालचाल आहे. Re-order to prepare a rough plan of ward structure
राज्यातील बृहन्मुंबई, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, पनवेल, मिरा भाईंदर, पिंपरी चिंचवड, पुणे, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड-वाघाळा, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर या महापालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. मुंबई वगळता अन्य महानगर पालिकेच्या निवडणुका तीन सदस्यीय पध्दतीने करण्याचा निर्णय शासनाने मध्यंतरी घेतला होता.
ओबीसी आरक्षणाबाबतच्या सुनावणीसाठी सुप्रीम कोर्टाने पुढची तारीख २१ एप्रिल ठेवली आहे. त्यामुळे महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका जून महिन्यामध्ये होण्याची शक्यता कमी आहे. २२ महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका लांबणीवर पडणार आहेत. निवडणूका आता किमान सप्टेंबर पर्यंत पुढे जातील, असे सांगितले जाते.