• Download App
    RBIची नवीन सुविधा : लवकरच सर्व ATM मध्ये कार्डलेस पैसे काढता येणार, सध्या फक्त काही बँकांकडेच आहे ही सुविधा|RBI's new facility Soon all ATMs will be able to withdraw cardless money, at present only a few banks have this facility

    RBIची नवीन सुविधा : लवकरच सर्व ATM मध्ये कार्डलेस पैसे काढता येणार, सध्या फक्त काही बँकांकडेच आहे ही सुविधा

    कार्डलेस पैसे काढण्याची सुविधा लवकरच देशातील सर्व एटीएममध्ये उपलब्ध होणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) या सुविधेवर काम करत आहे. सर्व बँका आणि सर्व एटीएम नेटवर्कमधून कार्ड-लेस रोख पैसे काढणे सुलभ करण्यासाठी युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) द्वारे ग्राहकांना परवानगी दिली जाईल, असे व्यवहार ATM नेटवर्कद्वारे सेटल केले जातील.RBI’s new facility Soon all ATMs will be able to withdraw cardless money, at present only a few banks have this facility


    वृत्तसंस्था

    मुंबई : कार्डलेस पैसे काढण्याची सुविधा लवकरच देशातील सर्व एटीएममध्ये उपलब्ध होणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) या सुविधेवर काम करत आहे. सर्व बँका आणि सर्व एटीएम नेटवर्कमधून कार्ड-लेस रोख पैसे काढणे सुलभ करण्यासाठी युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) द्वारे ग्राहकांना परवानगी दिली जाईल, असे व्यवहार ATM नेटवर्कद्वारे सेटल केले जातील.

    आरबीआय गव्हर्नर म्हणाले – यामुळे फसवणूक रोखण्यात मदत होईल

    शुक्रवारी आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, सध्या काही बँकांमध्ये डेबिट कार्डशिवाय एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा आहे. आता UPI वापरून सर्व बँका आणि एटीएम नेटवर्कवर कार्डलेस रोख पैसे काढण्याची सुविधा प्रदान करण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे कार्ड स्किमिंग, कार्ड क्लोनिंगसारख्या फसवणुकीला आळा घालण्यास मदत होईल आणि वापरकर्त्यांची सोय वाढेल.



    काही बँकांमध्येच कार्डलेस पैसे काढण्याची सुविधा

    सध्या काही बँकांमध्येच कार्डलेस पैसे काढण्याची सुविधा आहे. त्यात SBI, ICICI, Axis आणि बँक ऑफ बडोदा यांसारख्या बँका आहेत. सध्या कार्डलेस पैसे काढण्यासाठी मोबाईल बँकिंग अॅपचा वापर केला जातो. या सुविधेमध्ये 10,000 ते 20,000 च्या व्यवहाराची मर्यादादेखील आहे. काही बँका सध्या त्यांच्या ग्राहकांकडून या सुविधेसाठी अतिरिक्त व्यवहार शुल्क आकारतात.

    RBI’s new facility Soon all ATMs will be able to withdraw cardless money, at present only a few banks have this facility

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!