प्रतिनिधी
मुंबई : शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांची काही मिनिटांमध्ये सुरू होणारी पत्रकार परिषद आणि भाजपच्या साडेतीन नेत्यांना तुरूंगात घालण्यासाठी आहे? की महाविकास आघाडीत कुचंबणा आणि त्रासलेल्या शिवसैनिकांना गोळा करण्यासाठी आहे??, असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात विचारण्यात येत आहे.Raut’s press conference to surround three and a half BJP leaders
संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेपूर्वी भाजपवर तोफा डागून तसेच वेगवेगळी सूचक वक्तव्य करून वातावरण निर्मिती तर फार मोठी केली आहे. त्यात नाशिक, ठाणे, मुंबई इथल्या शिवसेना आमदार खासदार आणि अन्य नेत्यांना पत्रकार परिषदेसाठी बोलावण्यात आले आहे.
शेकडो शिवसैनिकांची गर्दी शिवसेना भवनावर होताना दिसत आहे. शिवसेनेच्या नेत्यांच्या बड्या-बड्या गाड्या शिवसेना भवना भोवती फिरताना दिसत आहेत. त्यामुळे संजय राऊत यांची पत्रकार परिषद ही भाजपच्या साडेतीन नेत्यांना तुरुंगात घालण्यासाठी आहे? की महाविकास आघाडीत आपला मुख्यमंत्री असूनही कुचंबणा झालेल्या आणि त्रासलेल्या शिवसैनिकांना गोळा करण्यासाठी आणि त्यांना काही हाताला काम देण्यासाठी घेण्यात येत आहेत??, असा सवाल राजकीय वर्तुळात विचारण्यात येत आहे.
– मुंबईकरांच्या त्रासात भर, वाहतुकीचा खोळंबा!
त्याच बरोबर संजय राऊत आणि शिवसेना नेत्यांची ही पत्रकार परिषद आहे की मोठ्या राजकीय कार्यक्रमाचा मेळावा आहे?, असा प्रश्न पडावा अशी स्थिती निर्माण झाली आहे. कारण संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेपूर्वी मुंबई पोलिसांनी शिवसेना भवन परिसर तसेच दादर परिसरामध्ये ठिकठिकाणी बॅरिकेट्स लावून बंदोबस्त वाढवला आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या त्रासातच भर पडली आहे. मुंबईची वाहतूक मंदावली आहे.
एरवी शिवसेना किंवा अन्य कोणतेही पक्षांचा राजकीय मेळावा असेल जाहीर सभा असेल तर या पद्धतीची वाहतूक मंदावते अथवा दुसऱ्या मार्गाने वळविण्यात येते. परंतु आज संजय राऊत आणि शिवसेना नेत्यांची पत्रकार परिषद आहे. ती शिवसेना भवनात आहे. तुला शिवसेनेचे आमदार खासदार आणि नेते हजर राहणार आहेत. दुपारी 4.00 वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेच्या आधी दुपारी 2.00 वाजल्यापासून ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत या परिसरातली वाहतूक दुसऱ्या मार्गांनी वळविण्यास संदर्भातले ट्विट मुंबई पोलिसांनी केले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या तथाकथित स्फोटक पत्रकार परिषदेचा त्रास सर्वसामान्य मुंबईकरांना भोगावा लागल्याचे दिसत आहे.