• Download App
    फोन टॅपिंग प्रकरणी गुन्हा रद्द करण्यासाठी रश्मी शुक्ला उच्च न्यायालयात|Rashmi Shukla in High Court to quash phone tapping case

    फोन टॅपिंग प्रकरणी गुन्हा रद्द करण्यासाठी रश्मी शुक्ला उच्च न्यायालयात

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणी गेल्याच आठवड्यात पुण्याच्या बंड पोलीस ठाण्यात ज्येष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा रद्द करण्यासाठी शुक्ला यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.Rashmi Shukla in High Court to quash phone tapping case

    शुक्ला यांची बदली हैदराबादमध्ये करण्यात आली आहे. सीआरपीएफ दलाच्या अतिरिक्त पोलीस संचालकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. २०१५ ते २०१९ दरम्यान राजकीय नेत्यांचे फोन कॉल्स बेकायदेशीररीत्या टॅप केल्याप्रकरणी शुक्ला यांच्यावर इंडियन टेलिग्राफ ॲक्टअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.



    आपल्याला नाहक या केसमध्ये गोवण्यात आले आहे, असे म्हणत शुक्ला यांनी गुन्हा रद्द करण्याची विनंती न्यायालयाला केली आहे.पुण्याच्या माजी पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. रश्मी शुक्ला यांच्यावर बेकायदेशीर फोन टॅपिंगचे आरोप झाले होते.

    त्यानंतर तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांची समिती स्थापन करण्यात आली. आता या समितीने आपला अहवाल सादर केल्यानंतर रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.रश्मी शुक्ला यांच्याविरोधात पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात टेलिग्राफ एक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    संजय पांडे यांच्या समितीने अहवाल दिल्यानंतर राज्य सरकारच्या आदेशाने हा गुन्हा दाखल झाला आहे. रश्मी शुक्ला राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त असताना त्यांनी बेकायदेशीर फोन टॉपिंग केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

    Rashmi Shukla in High Court to quash phone tapping case

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस