Sunday, 11 May 2025
  • Download App
    ज्यांनी दाऊदची प्रॉपर्टी घेतली त्या मलिकांची मस्ती आल्यासारखी भाषा होती, रावसाहेब दानवे यांचा आरोप|Raosaheb Danve alleges that those who took Dawood's property Ncp agitating for them

    ज्यांनी दाऊदची प्रॉपर्टी घेतली त्या मलिकांची मस्ती आल्यासारखी भाषा होती, रावसाहेब दानवे यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी

    नाशिक : मस्ती आल्यासारखी भाषा नवाब मलिकांना आली होती. ज्यांनी दाऊदची प्रॉपर्टी घेतली त्याच्यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस आंदोलन करत आहे. याचा अर्थ असा समजायचा का? की राष्ट्रवादीचा दाऊदच्या प्रकरणाला पाठिंबा आहे, असा सवाल केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे.Raosaheb Danve alleges that those who took Dawood’s property Ncp agitating for them

    महाविकास आघाडीचे सरकार हे अमर,अकबर,अँथनीचे सरकार आहे. पायात पाय अडकून पडतील, असा आरोप करून दानवे म्हणाले, आम्हाला राष्ट्रपती राजवट आणण्याची अजिबात इच्छा नाही. आता बाळासाहेबांसारखी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेणं अपेक्षित आहे. बाळासाहेबांनी जनतेची बाजू घेतली होती, तीच अपेक्षा उद्धव ठाकरेंकडून आहे.



    मलिकांवर झालेली कारवाई सूडबुद्धीने झाली नसल्याचे सांगून दानवे म्हणाले, ईडीची ही कारवाई काही फक्त आमच्याच काळात झाली का? लालूप्रसाद, मोदी, अमित शाह, कलमाडी, अशोक चव्हाण यांच्यावर कारवाई झाली तेव्हा आम्ही होतो का काँग्रेस हे विसरलेत का? हा आरोप राजकीय हेतूने प्रेरित आहे.

    जर गुन्हेगार नसाल तर कोर्टात सिद्ध करा. तक्रारी येतात म्हणून तर चौकशी होते. असे ते म्हणाले आहेत.युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांबाबत दानवे म्हणाले, युक्रेन आणि रशियात अडकलेले विद्यार्थी त्यांना भारतात आणणे प्राधान्य आहे. पंतप्रधानांनी यावर मंत्र्यांशी सविस्तर चर्चा केली आहे.

    4 मंत्री या देशांच्या लगत देशांत ठाण मांडून बसलेत. तसेच उद्या रात्री 1 विमान आणखी येणार आहे. भारतीयांना वाचविण्यासाठी भारताचे ऑपरेशन गंगा सुरू आहे. प्रधानमंत्र्यांनी भारतीयांना वाचविण्यासाठी काही मंत्र्यांची नियुक्ती केली. विद्यार्थ्यांनी भारत सरकारच्या हेल्पलाईनला संपर्क साधावा, अडकलेल्या नागरिकांनी घाबरून जाऊ नये.

    Raosaheb Danve alleges that those who took Dawood’s property Ncp agitating for them

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा