• Download App
    दोन राऊत विरुद्ध राणे : आरोप-प्रत्यारोपांची नुसतीच खडाखडी; पुराव्यांअभावी कुस्ती "बिन निकाली"...!!|Rane vs. Two Rauts: Allegations against the accused; Wrestling "Bin Nikali" due to lack of evidence

    दोन राऊत विरुद्ध राणे : आरोप-प्रत्यारोपांची नुसतीच खडाखडी; पुराव्यांअभावी कुस्ती “बिन निकाली”…!!

    विनायक ढेरे

    नाशिक : आज दिवसभरात केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेनेचे दोन राऊत संजय राऊत आणि विनायक राऊत यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची नुसतीच खडाखडी झाली. पण कोणीच एकमेकांविरुद्ध पुरावे न दिल्या मुळे बाळासाहेबांच्या पठ्ठ्यांमधली ही कुस्ती “बिन निकाली” ठरली…!!Rane vs. Two Rauts: Allegations against the accused; Wrestling “Bin Nikali” due to lack of evidence

    मुंबई महापालिकेला फक्त नारायण राणे यांच्या बंगल्याचे मोजमाप करण्याचे काम उरले आहे, असा आरोप करत नारायण राणे यांनी आज सकाळी शिवसेनेवर जोरदार ठोकून काढले. मातोश्रीतलेच बांधकाम बेकायदा आहे. आधी त्यांना दंड ठोठावा, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. त्यानंतर त्यांनी एका पाठोपाठ आरोपांच्या फैरी झाडल्या. त्यांच्या सगळ्यांच्या कुंडल्या माझ्याकडे आहेत. दिशा सालियनचा खून कसा झाला?,



    त्यावेळी तेथे कोण हजर होते?, हे सगळे मला माहिती आहे असे ते म्हणाले. त्याबद्दल तुम्ही पुरावे देऊ शकाल का?, असे पत्रकारांनी विचारल्यानंतर मी सीबीआयला आणि केंद्रीय तपास समस्यांना योग्यवेळी लेखी पुरावे देईन, असे ते म्हणाले. प्रत्यक्षात त्यांनी कोणतेही पुरावे पत्रकार परिषदेत सादर केले नाहीत.

    नारायण राणे यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर शिवसेनेचे रत्नागिरीचे खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. नारायण राणे यांच्यावर सिंधुदुर्गातल्या 7 खूनांचा खळबळजनक आरोप केला. यावेळी त्यांच्या समवेत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर होत्या. विनायक राऊत यांनी देखील नारायण राणे यांच्यावर विविध शाब्दिक तोफा डागताना प्रत्यक्षात 7 खुनांचे पुरावे दिले नाहीत.

    विनायक राऊत आणि किशोरी पेडणेकर यांची पत्रकार परिषद सुरू असताना संजय राऊत तिथे आले. त्यांनी देखील नारायण राणे यांच्यावर जोरदार आगपाखड करून घेतली. त्याच वेळी संजय राऊत यांनी पालघर मध्ये ईडीच्या कोणत्या अधिकार्‍याची कोट्यवधींची गुंतवणूक आहे?, असा सवाल करत पुढच्या आठवड्यात अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचा गौप्यस्फोट करू, असा इशारा दिला.

    पण हा इशारा देताना संजय राऊत यांनी तीनच दिवसांपूर्वी शिवसेना भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपण भाजपच्या नेत्यांची साडेतीन नावे सांगितलीच नाहीत, हे विसरून गेले. आता ते नवा गौप्यस्फोट करणार आहेत. पण यावेळी देखील संजय राऊत यांनी आपल्या आरोपाच्या पुष्टी दाखल कोणतेही पुरावे दिले नाहीत.

    एकूण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुत्रासाठी त्यांच्यात पठ्ठ्यांमध्ये रंगलेल्या या कुस्तीमध्ये नुसतीच खडाखडी सुरू आहे आणि पुराव्यांअभावी कुस्ती “बिन निकाली” ठरताना दिसत आहे…!!

    Rane vs. Two Rauts: Allegations against the accused; Wrestling “Bin Nikali” due to lack of evidence

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    अजितदादांच्या अकाली एक्झिटची सहानुभूती फक्त पुणे जिल्ह्यात??, ZP निवडणुकीत भाजपच नंबर 1, अजितदादांची राष्ट्रवादी नंबर 3, तर शरद पवारांची राष्ट्रवादी 6 नंबर वर!!

    राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर पवार गटाचा नुसताच गदारोळ; सुनेत्रा पवार गप्प, फडणवीस विदर्भ आणि तेलंगणाच्या कार्यक्रमांमध्ये मग्न!!

    ॲडव्हांटेज विदर्भ 2026 मध्ये इंटरनॅशनल बिझनेस कॉन्क्लेव्हचे उद्घाटन; 22 देशांचे राजदूत, वाणिज्यदूतांची उपस्थिती