विशेष प्रतिनिधी
अमरावती : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीच्या भोंग्यावरून हलकल्लोळ माजवला आहे. त्यांनी हनुमान चालीसा भोंग्यावर लावण्याचे आवाहन केले. तर दुसरीकडे आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी मातोश्री समोर हनुमान चालीसा म्हणण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. शुक्रवार, २२ एप्रिलपासून राणा दाम्पत्य मुंबईत दाखल झाल्यापासून मुंबईच्या रस्त्यांवर हजारो शिवसैनिक उतरले. एका अपक्ष आमदार आणि खासदाराने अवघी शिवसेना फरफटत नेली आहे, त्यामुळे मुंबईत शिवसेनेच्या ताकदीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्याच वेळी अमरावतीतील शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांचे अस्तित्व धोक्यात येणार आहे.Rana couple’s gun towards Matoshri; Actually artillery shells on Shiv Sena’s Balekilla in Amravati
आधीच अडसूळांमागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. त्यात राणा दांपत्याला थेट मातोश्रीशी राजकीय पंगा घेतला आहे. राणा दांपत्याला संपूर्ण राज्यात त्याचे राजकीय मायलेज मिळत आहे. त्याचा परिणाम अमरावतीच्या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यावर होतो आहे.
मुंबईतील शिवसेनेच्या ताकदीवर प्रश्नचिन्ह
अमरावती हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. शिवसेना नेते आनंदराव अडसूळ हे या भागाचे प्रतिनिधित्व केले. मात्र २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट असताना नवनीत राणा यांनी आनंदराव अडसूळ यांचा पराभव करून अपक्ष खासदार म्हणून निवडून आल्या. नवनीत राणा यांनी त्यावेळी शिवसेनेला धूळ चारली आहे. तेव्हापासून राणा दाम्पत्याचे या भागात अस्तित्व वाढले आहे.
अशा परिस्थितीत राणा दाम्पत्य यांनी थेट शिवसेनेला आव्हान दिले आहे. शिवसैनिकांची अस्मिता असलेल्या मातोश्री बंगल्यासमोरच हनुमान चालीसा म्हणण्याचा निश्चय केला आहे. त्यामुळे राणा दाम्पत्य चर्चेत आले आहे. मात्र शिवनेनेने राणा दाम्पत्याना मातोश्रीकडे येऊ न देण्यासाठी अवघे शिवसैनिक रस्त्यावर उतरवले. त्यामुळे राणा दाम्पत्य महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रस्थानी आले आहेत.
मुंबईत अपक्ष राणा दाम्पत्यांसाठी सेनेला इतका संघर्ष करावा लागत आहे, यावरून शिवसेनेच्या ताकदीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. त्याच वेळी राणा दाम्पत्याने अमरावतीतील त्यांचे राजकीय अस्तित्व मजबूत केले आहे. यामुळे अमरावतीतील आनंदराव अडसूळ यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे आणि राणा दांपत्याचे राजकीय अस्तित्व मजबूत झाले आहे.
Rana couple’s gun towards Matoshri; Actually artillery shells on Shiv Sena’s Balekilla in Amravati
महत्त्वाच्या बातम्या
- ‘अजान’ची टिंगल करण्याची हिंमत अमोल मिटकरींमध्ये आहे का ? समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनाचा प्रश्न
- Amit Mishra : होय माझा देश सुंदरच पण फक्त राज्यघटनेच्या अनुयायांसाठी!!; इरफान – अमित आमने – सामने!!
- खैरमध्ये महिलेचे मुंडण करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी
- Hanuman Chalisa : मातोश्रीवर येत मुख्यमंत्र्यांचे राणा दाम्पत्याला प्रतिआव्हान!!; शिवसैनिकांचे खार मध्ये राणांच्या घरासमोर टाळ मृदुंगासह भजन!!