• Download App
    महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेला अध्यक्ष मिळाले चार वेळा विदर्भ केसरी स्पर्धा जिंकणारे रामदास तडस!!; पवारांचे वर्चस्व संपुष्टात Ramdas Tadas, who won the four-time Vidarbha Kesari Championship, got the President of the Maharashtra Kustigir Parishad

    महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेला अध्यक्ष मिळाले चार वेळा विदर्भ केसरी स्पर्धा जिंकणारे रामदास तडस!!; पवारांचे वर्चस्व संपुष्टात

    प्रतिनिधी

    मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार अध्यक्ष असलेली महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद काही दिवसांपूर्वी बरखास्त केली होती. त्यावेळी राजकीय हेतूने हा निर्णय झाल्याचीही चर्चा होती. मात्र आता भाजप खासदार रामदास तडस महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. Ramdas Tadas, who won the four-time Vidarbha Kesari Championship, got the President of the Maharashtra Kustigir Parishad

    ३१ जुलै रोजी नागपुरात कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. मात्र काकासाहेब पवार आणि धवलसिंह मोहिते पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. रामदास तडस हे वर्धा लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. तडस हे स्वतः चार वेळा विदर्भ केसरी राहिले आहेत.

    शरद पवारांचे वर्चस्व संपवून कुस्तीगीर परिषदेवर ताबा मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न यशस्वी झाला आहे. काकासाहेब पवार सचिव, तर वैभव लांडगे उपाध्यक्षपदी असतील.या आधी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचं उपाध्यक्षपद रामदास तडस यांनी भूषवलं आहे. तडस हे स्वतः चार वेळा विदर्भ केसरी राहिले आहेत. तडस अजूनही अनेकदा कुस्तीच्या मैदानात उतरल्याचे पाहायला मिळते.

    कोण आहेत रामदास तडस?

    रामदास तडस हे वर्धा लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर सलग दुसऱ्यांदा खासदार आहेत. २०१४ मध्ये दोन लाखांहून जास्त मताधिक्य मिळवत काँग्रेस उमेदवार सागर मेघे यांचा त्यांनी पराभव केला होता. २०१९ मध्ये त्यांनी आपली जागा राखण्यात यश मिळवलं.

    याआधी रामदास तडस राष्ट्रवादीत होते. वर्धा चंद्रपूर गडचिरोली विधान परिषदेतून तडस दोन वेळा आमदार झाले आहेत. देवळी नगरपरिषदेचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं आहे. तर राष्ट्रवादीने त्यांना एसटी महामंडळाचं संचालकपदही दिलं होतं. पण आता ‘घड्याळ’ सोडून भाजपात गेलेला खासदारच शरद पवारांची जागा घेणार असल्याचं निश्चित झालं आहे.

    २००९ मध्ये भाजप प्रवेशानंतर त्यांनी देवळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली, मात्र माजी राज्यमंत्री रणजीत कांबळेंकडून त्यांना पराभवाचा धक्का बसला होता.

    Ramdas Tadas, who won the four-time Vidarbha Kesari Championship, got the President of the Maharashtra Kustigir Parishad

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस