Ramdas Athawale : शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांनी मुख्यमंत्री व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रामुळे अवघ्या राज्यात खळबळ उडाली आहे. यावर आता रिपाइंचे नेते रामदास आठवले यांनीही मुख्यमंत्री ठाकरे यांना भाजपशी जुळवून घेण्याविषयी आवाहन केलं आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी आज मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून भाजपसोबत जुळवून घेण्याचं आवाहन केलं. त्यानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा शिवसेना-भाजपच्या युतीच्या चर्चांना सुरुवात झाली आहेत. त्यात रामदास आठवले यांनीही उद्धव ठाकरे यांना युतीसाठी आवाहन केलं आहे. Ramdas Athawale Suggest CM Thackeray To Make Alliance With BJP Watch Video
विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांनी मुख्यमंत्री व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रामुळे अवघ्या राज्यात खळबळ उडाली आहे. यावर आता रिपाइंचे नेते रामदास आठवले यांनीही मुख्यमंत्री ठाकरे यांना भाजपशी जुळवून घेण्याविषयी आवाहन केलं आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी आज मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून भाजपसोबत जुळवून घेण्याचं आवाहन केलं. त्यानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा शिवसेना-भाजपच्या युतीच्या चर्चांना सुरुवात झाली आहेत. त्यात रामदास आठवले यांनीही उद्धव ठाकरे यांना युतीसाठी आवाहन केलं आहे.
शिवसेनेच्या हिताचा विचार करावा
“शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केलेल्या मताला माझा पाठिंबा आहे. मी याआधीही सांगत आलो आहे. शिवसेनेच्या भवितव्याचा, महाराष्ट्राच्या हिताचा आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नांचा विचार करून उद्धव ठाकरे यांनी भाजपशी युती करावी,” असं आवाहन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं.
काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर जुळवून घेणं कठीण
रामदास आठवले यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर यासंबंधी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. त्यात त्यांनी उद्धव ठाकरे यांना साद घातली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसशी जुळवून घेताना मुख्यमंत्र्यांना कठीण जात असल्याचंही म्हटलं आहे.
शिवसेनेने आता काँग्रेस -राष्ट्रवादीला बाजूला सारूनभाजपशी युती करावी ही आमदार प्रताप सरनाईक यांनी मांडलेली भूमिका अत्यंत योग्य आहे. शिवसेना-भाजपच्या नेत्यांचे एकमेकांशी आजही जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे पुन्हा भाजपशी युती करण्यात शिवसेनेला अडचण येणार नाही, अशी सरनाईक यांची सूचना योग्य आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी जोडीच्या चक्रात उद्धव ठाकरे अडकले आहे. त्यामुळे त्यांना काम करणंही अवघड होत आहे, असंही आठवले म्हणाले.
आठवलेंनी दिला फॉर्म्युला
रामदास आठवले केवळ आवाहन करूनच थांबले नाहीत, त्यांनी शिवसेनेला युतीचा फॉर्म्युलाही दिला. शिवसेनेनं पुन्हा भाजपसोबत युती करून राज्यात अडीच वर्षांसाठीचं मुख्यमंत्रिपद वाटून घ्यावं. अडीच वर्षे देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रिपद द्यावं, तर अडीच वर्षे शिवसेनेनं घ्यावं. यातच महाराष्ट्राचं आणि दोन्ही पक्षांचंही भलं आहे,” असंही रामदास आठवले म्हणाले.
Ramdas Athawale Suggest CM Thackeray To Make Alliance With BJP Watch Video
महत्त्वाच्या बातम्या
- आघाडीत बिघाडी : नाना पटोले म्हणाले – महाविकास आघाडी कायमस्वरूपी नाही, फक्त ५ वर्षांसाठी !
- पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या दरांवर राहुल गांधींची टीका, म्हणाले – ‘मोदी सरकारने टॅक्स वसुलीत पीएचडी केली!
- कोरोना प्रतिबंधक लसी आणि औषधे पेटंटमुक्तीसाठी विश्व जागृती दिन संपन्न; १६ लाख लोकांचे समर्थन
- पंजाब काँग्रेसमध्ये घमासान, आमदार पुत्रांना सरकारी नोकरीप्रकरणी मुख्यमंत्र्यांविरुद्ध अनेक नेत्यांनी ठोकले शड्डू
- प्रताप सरनाईक यांच्या उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया, म्हणाले – कोण त्रास देतोय ते शोधलं पाहिजे!