प्रतिनिधी
कोल्हापूर – मराठा आरक्षणासाठी नांदेडमध्ये खासदार संभाजी राजे यांनी घेतलेल्या मेळाव्यात हजर राहिलेल्या मराठा आंदोलकांवर ठाकरे – पवार सरकारने गुन्हे दाखल केले आहेत. त्यावरून खासदार संभाजी राजे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. गुन्हे दाखल करायचे असतील, तर माझ्यावर करा, असे आव्हानच त्यांनी सरकारला दिले आहे. Rajya sabha MP Sambhaji Raje dares Thackeray – Pawar govt over Maratha reservation issue
मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला ओबीसी समाजाच्या सर्व सवलती मिळाव्यात, सारथी संस्थेला भरीव निधी द्यावा, अण्णासाहेब पाटील महामंडळाच्यावतीने तरुणांना कर्ज उपलब्ध करून द्यावे, यासह अनेक मागण्यांसाठी संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. कोल्हापूर येथे आंदोलनाची सुरुवात झाल्यानंतर सरकारने मागण्यांच्या पूर्ततेसाठी महिन्याची मुदत मागितली होती. ती मुदत संपल्यानंतरही मागण्याबाबत निर्णय न घेतल्याने पुन्हा आंदोलन सुरू करण्यात आले.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नियम न पाळल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर संभाजी राजे यांनी संतप्त प्रतिक्रया व्यक्त केली आहे. गुन्हा दाखल करायचाच असेल तर माझ्यावर करा, सामान्य गरीब मराठा बांधवांवर गुन्हा का? असा सवाल त्यांनी केला आहे. राजकीय पक्षांना वेगळा न्याय आणि मराठा समाजाला वेगळा न्याय, असे का? असा सवाल करत त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
Rajya sabha MP Sambhaji Raje dares Thackeray – Pawar govt over Maratha reservation issue
महत्त्वाच्या बातम्या
- राज ठाकरेंना प्रत्युत्तर देताना रोहित पवार म्हणतात, “राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर तो पक्ष लोकांनी डोक्यावर घेतला…!!”
- सराफ व्यापाऱ्यांचा २३ ऑगस्टला बंद हॉलमार्क युनिक इडेंटिफिकेशन नंबरमुळे अडचण
- कलाकारांना किमान खड्डे बुजविण्याची तरी काम द्या; ‘ठाकरे’ चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित पानसे यांचा राज्य सरकारवर निशाणा