• Download App
    अपक्ष आमदारांच्या भूमिकेला तलवारीची धार, शिवसेनेवर करताहेत वार!!Rajya sabha Elections : independent MLA's are pressuring Shivsena for funding for constituencies and other things

    राज्यसभा निवडणूक : अपक्ष आमदारांच्या भूमिकेला तलवारीची धार, शिवसेनेवर करताहेत वार!!

    प्रतिनिधी

    मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपल्या ताकदीपेक्षा एक जादाचा उमेदवार उभा केल्यानंतर आपोआपच अपक्ष आमदारांच्या मतांची गरज निर्माण झालेली पाहून अपक्ष आमदारांच्या भूमिकांना तलवारीची धार आली आहे आणि ते शिवसेनेवर वार करायला सज्ज आहेत!!Rajya sabha Elections : independent MLA’s are pressuring Shivsena for funding for constituencies and other things

    राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने गेल्या अडीच वर्षातले उट्टे काढण्यासाठी आणि आपली पुढची अडीच वर्षांची “बेगमी” करण्यासाठी सगळेच अपक्ष आमदार सज्ज आहेत. त्यातही राज्यमंत्री बच्चू कडू, शिवसेना पुरस्कृत आशिष जयस्वाल, अपक्ष आमदार किशोर जोरगेवार आदी आमदार आघाडीवर दिसत आहेत. त्याचबरोबर हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे 3 आमदारही मागे नाहीत. या सगळ्या आमदारांच्या मागण्या शिवसेनेला आता पूर्ण कराव्या लागणार आहेत.

    – सुप्रिया सुळे – जोरगेवार भेट

    राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आमदार किशोर जोरगेवार यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली आहे. त्यांच्या मातोश्रींची देखील भेट घेऊन त्यांच्या डबावाला उपक्रमाचे कौतुक करण्यासाठी सुप्रिया सुळे यांनी राज्यसभा निवडणुकीचा मुहूर्त साधला आहे.



    – खुद्द शिवसेना आमदारांमध्ये अस्वस्थता

    घोडेबाजार हा वरवर बोलण्याचा विषय राजकीय वर्तुळात असला तरी दस्तुरखुद्द शिवसेना आमदारांनी मधील अस्वस्थता, निधी वाटपातून राष्ट्रवादी काँग्रेसने केलेला अन्याय यालाही जोरात तोंड फुटल्याने शिवसेनेचे नेतृत्व अतिसावध झालेली दिसत आहे. आधी निवडणुकीपूर्वी दोन दिवस म्हणजे आठ जून पासून आमदारांना मुंबई बोलवण्याची योजना शिवसेनेने अलिकडे आणून आज सहा तारखेलाच शिवसेना आमदारांच्या जमावडा मुंबई एकत्र केला आहे. “वर्षा”वर त्यासाठी मुख्यमंत्र्यांसमवेत यांची खलबते सुरू आहेत.
    शिवसेना आमदारांना जमवून एकत्र ठेवण्यात शिवसेना आज जरी यशस्वी होत असले तरी मी दहा तारखेपर्यंत नेमके काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

    – काँग्रेसमध्ये देखील अस्वस्थता

    जशी चलबिचल शिवसेनेत आणि अपक्ष आमदारांनी मध्ये आहे, तशीच चलबिचल काँग्रेस मध्ये दिसत आहे.काँग्रेसमध्ये लादलेल्या उमेदवारांमुळे चलबिचल आहे. ही चलबिचल रोखण्याचे आव्हान काँग्रेसच्या प्रदेश नेतृत्व पुढे आहे. काँग्रेसमध्ये आपला उमेदवार देण्याची हायकमांडची पद्धत आहे. पण निवडून आणण्याची जबाबदारी प्रादेशिक नेतृत्वावर देण्यात येते. आता काँग्रेसचे प्रादेशिक नेते ही जबाबदारी कशी पार पाडतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.

    – संजय राऊत यांचे वक्तव्य

    पण या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छोट्या पक्षांच्या आणि अपक्ष आमदारांच्या भूमिकेला धार आली आहे, अशी कबुली शिवसेनेचे उमेदवार आणि प्रवक्ते खुद्द संजय राऊत यांनी दिली आहे. संजय राऊत यांच्या एका प्रतिक्रियेतून शिवसेनेच्या गोटात किती खळबळ आहे हेच दिसून येते आहे.

    Rajya sabha Elections : independent MLA’s are pressuring Shivsena for funding for constituencies and other things

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा