प्रतिनिधी
मुंबई : राज्यसभा निवडणूक अवघ्या काही तासांवर आली असताना फाइव्ह स्टार डिप्लोमसी जोरात आली असून एकमेकांना शह-काटशहाच्या नादात नेमका कुणाचा पतंग कापला जाणार?, याची चर्चा राजधानी मुंबईत आहे.Rajya Sabha elections: Imran Pratapgadhi is a threat to Thackeray-Pawar government
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी प्रमुख लढत जरी संजय पवार आणि धनंजय महाडिक या कोल्हापूरी पहिलवानांमध्ये असली तरी क्रॉस व्होटिंगच्या नादात मधल्यामध्ये काँग्रेस हायकमांडने दिलेले इम्रान प्रतापगडी या उमेदवाराचा पतंग कटायला नको, अशी चर्चा मुंबईत आहे. तसे घडले ठाकरे – पवार सरकारची कंबख्ती ओढवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा काँग्रेसच्या वर्तुळातून देण्यात आला आहे. कारण इमरान प्रतापगडी आहे प्रियांका गांधींचे निकटवर्तीय आहेत आणि त्यांना पाडण्याची रिस्क घेणे ही काँग्रेसची संपूर्ण नाराजी ओढवून घेऊन महाविकास आघाडीचे सरकारच राजकीय स्टेकला लावण्यासारखे आहे. अर्थात आज रात्रभर या चर्चा इकडून तिकडून घडत राहणार आहेत.
राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रात मोठा भूकंप होणार का याची चर्चा आता सुरू झाली आहे. राज्यसभेसाठी उद्याचे मतदान खुल्या पद्धतीने होणार असले तरी महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात भविष्यातील नवी राजकीय समीकरणे या निवडणुकीच्या निमित्ताने मांडली जाणार आहेत.
राज्यसभेच्या 6 जागांसाठी 7 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. भाजपकडून केंद्रीय मंत्री पियुष गोयल, राज्याचे माजी कृषिमंत्री अनिल बोंडे, तसेच तिसरा उमेदवार म्हणून धनंजय (मुन्ना) महाडिक यांनी अर्ज दाखल केले आहेत.
शिवसेनेकडून संजय राऊत, संजय पवार तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल पटेल आणि काँग्रेसचे इम्रान प्रतापगडी असे सात उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीत प्रत्येक पक्षाच्या आमदारांना मतदान खुल्या पद्धतीने दाखवून करायचे आहे. सर्व पक्षांच्या आमदारांना त्यांचे व्हीप लागू असणार आहेत.
पण, सर्वात महत्त्वाचा राजकीय डाव हे छोटे पक्ष आणि अपक्ष आमदार मांडणार आहेत. हे अपक्ष आमदार आणि छोटे पक्ष नेमकी काय भूमिका घेतात यावरच भाजपाचा तिसरा उमेदवार मुन्ना महाडिक किंवा शिवसेनेचे संजय पवार यांचे भवितव्य अवलंबून आहे.
शिवसेना की काँग्रेस नेमका धोका कुणाला ?
भाजपाने आखलेल्या डावपेचात शिवसेनेचे संजय पवार, काँग्रेसचे इम्रान प्रतापगडी यांचा बळी जाणार की भाजपची खेळी त्यांच्याच अंगलट येऊन मुन्ना महाडिक यांना धोबीपछाड मिळणार याचे उत्तर उद्या मिळणार आहे.
काँग्रेसचे इम्रान प्रतापगडी हे उत्तर प्रदेशचे असून त्यांच्याविरोधात स्थानिक आमदारांमध्ये नाराजी आहे. त्याचा फायदा भाजप घेणार की शिवसेना असा प्रश्न आहे. शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला तर त्याचे महाविकास आघाडीवर त्याचा नेमका किती परिणाम होईल ते सांगता येणार नाही.
मात्र, काँग्रेसने दिल्लीतून दिलेल्या इम्रान प्रतापगडी यांचा पराभव झाला तर मात्र महाविकास आघाडीत भूकंप माजेल अशी एक शक्यता वर्तवली जात आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे प्रियांका गांधी यांचे इम्रान प्रतापगडी अतिशय निकटवर्तीय आहेत. काँग्रेस हायकमांडने दिलेला त्यांच्या अगदी जवळचा उमेदवार पडला जात असेल तर भविष्यात महाविकास आघाडी धोक्यात येऊ शकते.
काँग्रेस याबाबत काही मोठा निर्णय घेऊ शकतो अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यामुळे भाजपदेखील मोठा भूकंप घडविण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे
Rajya Sabha elections: Imran Pratapgadhi is a threat to Thackeray-Pawar government
महत्वाच्या बातम्या
- राज्यसभा निवडणूक : मतांचा घटला “कोटा”; कोणाचा फायदा, कोणाचा तोटा??
- केसीआर-ओवेसींच्या बालेकिल्ल्यामध्ये भाजपची मोहीम : हैदराबादेत 2-3 जुलै रोजी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक, 2024ची रणनीती ठरणार
- मान्सून 2 दिवसांत महाराष्ट्रात; उत्तर महाराष्ट्रासह बहुतांश भागात मान्सूनपूर्व पाऊस!!
- भारताविरुद्ध पाकिस्तानात बसून कट रचतेय SJF, ‘खलिस्तानी नकाशा’चे अनावरण, शिमल्याला दाखवले राजधानी