• Download App
    2024 लोकसभा : ना भाजप, ना महाविकास आघाडी; राजू शेट्टींच्या स्वाभिमानीची स्वतंत्र लढाई!! Raju shetty's swabhimani shetkari sanghatana to contest loksabha Elections 2024 all alone, not to allien with BJP or MVA

    2024 लोकसभा : ना भाजप, ना महाविकास आघाडी; राजू शेट्टींच्या स्वाभिमानीची स्वतंत्र लढाई!!

    प्रतिनिधी

    कोल्हापूर : लोकसभा निवडणूक 2024 अजून तब्बल 14 महिने पुढे असताना सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी चालवली आहे. महाराष्ट्र देखील भाजप शिंदे यांची शिवसेना विरुद्ध महाविकास आघाडी एकमेकांविरुद्ध दंड थोपटणार आहेत. पण आता त्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी स्वतंत्रपणे उडी घेतली आहे. Raju shetty’s swabhimani shetkari sanghatana to contest loksabha Elections 2024 all alone, not to allien with BJP or MVA

    राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना लोकसभेच्या निवडणुकीत भाजप अथवा महाविकास आघाडी यापैकी कोणाशीही युती करणार नसून पाच ते सहा जागांवर स्वतंत्रपणे उमेदवार उभे करणार आहे. यामध्ये हातकणंगलेच्या जागेचा प्रामुख्याने समावेश असेलच. याखेरीज अन्य पाच – सहा लोकसभा मतदारसंघांमध्ये देखील स्वाभिमानी उमेदवार उभे करेल, अशी माहिती राजू शेट्टी यांनी दिली आहे.



    महाराष्ट्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची विशिष्ट मतदारसंघांत मोठी ताकद आहे. त्यामध्ये कोल्हापूर जिल्हा, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्हे यांचा समावेश होतो. त्यामुळे राजू शेट्टी ज्यांच्या बाजूने निवडणुकीच्या मैदानात उतरतात, त्या पक्षांना या ताकदीचा काही फायदा होतो. हा अनुभव भाजपने 2014 च्या निवडणुकीत घेतला आहे. मध्यंतरी शरद पवार यांच्याशी जवळीक वाढवून राजू शेट्टी महाविकास आघाडीच्या जवळ गेले होते त्यांना विधान परिषदेवर पाठविण्याची शिफारस महाविकास आघाडीने राज्यपालांकडे केली होती. पण ही शिफारस काही फळाला आली नाही आणि अखेरीस राजू शेट्टी महाविकास आघाडी पासून देखील दूर झाले.

    आता राजू शेट्टी जेव्हा महाविकास आघाडी आणि भाजप या दोन्हीपैकी कोणाच्याही जवळ न जाता स्वतंत्र होणे निवडणूक लढवणार आहेत, तेव्हा त्यांच्या निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा फायदा कोणाला होतो आणि तोटा कोणाला होतो??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

    Raju shetty’s swabhimani shetkari sanghatana to contest loksabha Elections 2024 all alone, not to allien with BJP or MVA

    महत्वाच्या बातम्या 

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस