• Download App
    Raju Shetti : राजू शेट्टी नाराज राष्ट्रवादीवर; कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत फटका बसणार काँग्रेसला!! । Raju Shetti: Raju Shetty angry with NCP; Congress will be hit in Kolhapur North by-election !!

    Raju Shetti : राजू शेट्टी नाराज राष्ट्रवादीवर; कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत फटका बसणार काँग्रेसला!!

    नाशिक : गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत नाराज असलेले माजी खासदार राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना आघाडीतून बाहेर पडण्याचे राजकीय संकेत मिळत आहेत. स्वतः राजू शेट्टी यांनी त्याचे सूतोवाच केले आहेत. 5 एप्रिल रोजी शेतकरी संघटनेच्या बैठकीत महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा अंतिम निर्णय होईल. Raju Shetti: Raju Shetty angry with NCP; Congress will be hit in Kolhapur North by-election !!

    – खरी नाराजी राष्ट्रवादीवर

    विधान परिषदेच्या आमदार मकी पासून ते शेतकऱ्यांना उसाच्या एफआरपीचे तुकडे करून रक्कम मिळण्या पर्यंत अनेक मुद्द्यांवर राजू शेट्टी महाविकास आघाडीवर नाराज आहेत. त्यामुळेच ते महाविकास आघाडी मतून बाहेर पडून भाजपशी जवळीक साधण्याचा बेतात आहेत.

    – वास्तवाचे भान

    पण राजू शेट्टी यांना राजकीय वास्तवाचे भान देखील आहे. महाविकास आघाडीतून आपण बाहेर पडल्याने महाविकास आघाडीला फरक पडणार नाही, असा टोला त्यांनी लगावला आहे. याचाच अर्थ राज्याच्या पातळीवर महाविकास आघाडीला स्वाभिमानी शेतकरी संघटना बाहेर पडली तर फरक पडणार नाही पण आता कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक आहे. तेथे मात्र राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी संघटनेचा संघटनेच्या महाविकास आघाडीचे बाहेर पडण्याच्या निर्णयाचा फरक पडेल. अर्थातच तो फरक काँग्रेससाठी प्रतिकूल ठरेल आणि भाजपच्या उमेदवाराच्या पथ्यावर पडेल.



    – राजकीय बारकावा

    या सगळ्या राजकारणातला बारकावा असा की राजू शेट्टी यांना आश्वासन आमदारकीचे आश्वासन दिले होते. राज्यपालांनी अजूनही 12 आमदारांचा विषय लोंबकळत ठेवल्याने राजू शेट्टी आमदार होऊ शकलेले नाहीत. म्हणजे एक प्रकारे राजू शेट्टींच्या आमदारकीचा निर्णय लोंबकळत ठेवलाय भाजपने आणि कोल्हापूर उत्तर मध्ये ताकद लावून राजू शेट्टी दुष्परिणाम करणार आहेत काँग्रेसवर…!! असे हे राजकारणातले त्रांगडे आहे.

    – पवारांना हवेच आहे

    विधानसभेत काँग्रेसचा आमदार कमी झाला तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ते हवेच आहे. त्याने महाविकास आघाडीचे सरकार काही पडत नाही पण काँग्रेसची ताकद मात्र घटलेली दिसेल. शिवाय कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसची राजकीय अस्तित्व संपून जाईल. अशावेळी पवार तरी कशासाठी राजू शेट्टींना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यापासून रोखतील…?? साधा हिशोब आहे.

    – राजू शेट्टी यांचे प्रभावक्षेत्र

    कोल्हापूर जिल्हा आणि थोडाफार सांगली जिल्हा यात राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी संघटनेचा राजकीय प्रभाव आहे. बाकीच्या जिल्ह्यांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आंदोलक म्हणून प्रभाव आहे. त्यामुळे जो काही राजकीय फरक पडणार आहे तो कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पडणार आहे. त्यातही कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसवर परिणाम होणार आहे. एक प्रकारे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या हे पथ्यावरच पडणार आहे. त्यामुळे राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडणे याने महाविकास आघाडीला फरक पडण्यापेक्षा तो काँग्रेसला पडणार आहे हेच यातून दिसून येत आहे.

    – कोल्हापूर निवडणुकीतले बाकीचे फॅक्टर

    अर्थात कोल्हापूर पोटनिवडणुकीत फक्त राजू शेट्टी हा एकमेव फॅक्टर नाही तर आता धनंजय मुंडे यांची पत्नी करुणा शर्मा कोल्हापूर पोटनिवडणुकीत उमेदवार म्हणून उतरणार आहे यावेळी शिवसेनेचे माजी आमदार आणि प्रभावशाली नेते राजेश क्षीरसागर हे नेमकी काय भूमिका घेतात? याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. पण या सगळ्यांचा एकंदरीत दुष्परिणाम मात्र काँग्रेसला भोगावे लागणार आहेत. हे दिसून येते. कारण हे सगळे एकाच दिशेने ताकद लावणारे घटक आहेत. तो म्हणजे काँग्रेसचा पराभव करणे. ही निवडणुक महाविकास आघाडीत राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्रित लढणार असली आणि उमेदवार जरी काँग्रेसचा देणार असले तरी राष्ट्रवादी देखील कितपत मनापासून लढेल, या विषयी शंका व्यक्त करण्यात येत आहे.

    Raju Shetti : Raju Shetty angry with NCP; Congress will be hit in Kolhapur North by-election !!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!