विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : नुकताच किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर मनी लाँड्रिंगचे आरोप केले होते आणि ईडी चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर अनिल परब यांनादेखील ईडीने चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात सोमय्या यांनी ट्वीट देखील केले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून ते म्हणतात की, “किरीट सोमय्या यांच्या मध्ये जर हिंमत असेल तर मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेतील भ्रष्टाचारही त्यांनी बाहेर काढावा” असे त्यांनी आव्हान दिले आहे.
Raju shetti challenges kirti somaiya to expose corruption in mumbai bank
मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कारभाराच्या चौकशीचे आदेश राज्याच्या सहकारी खात्याने सध्या दिले आहे. भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर या बँकेचे अध्यक्ष आहेत.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले की, महापूर येऊन दोन महिने झाले आहेत. अजूनही शेतकरी आणि पूरग्रस्त नागरिकांना सरकारची हवी तशी मदत मिळाली नाहीये. लवकरात लवकर ही मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. जर ही मदत वेळेत मिळाली नाही तर जनतेच्या उद्रेकाला सामोरे जाण्याची तयारी सरकारने ठेवावी, असा देखील इशारा त्यांनी दिला आहे.
राजकीय वर्तुळात होणाऱ्या सध्याच्या घडामोडींवर बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, आम्ही साखर कारखान्यांमधील गैर व्यवहार बाहेर काढताना कोणता प्रांत, पक्ष असा भेदभाव केला नाही. देशातील सर्व राज्यातील साखर कारखान्यांचा गैरव्यवहार बाहेर काढला. सोमय्या मात्र विशिष्ट पक्षाच्या राजकीय नेत्यांच्या मागे लागले आहेत. विशिष्ट नेत्यांचे भ्रष्टाचार बाहेर काढत आहेत. शेतकऱ्यांचा वापर राजकारणासाठी करत आहेत. त्यांच्यात हिंमत असेल तर मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेतील भ्रष्टाचार बाहेर काढावा असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.
Raju shetti challenges kirti somaiya to expose corruption in mumbai bank
महत्त्वाच्या बातम्या
- देशाच्या इतिहासात प्रथमच पंतप्रधानांचा अमेरिकेला विनाथांबा थेट प्रवास
- CYCLONE GULAB : प्रवाशांनो कृपया लक्ष द्या ! चक्रीवादळ गुलाबमुळे भारतीय रेल्वेने 27 सप्टेंबरपर्यंत अनेक गाड्या केल्या रद्द ; पाहा संपूर्ण यादी…
- एअरबस कडून भारत ५६ लष्करी वाहतूक विमाने खरेदी करणार, तब्बल २० हजार कोटींचा करार
- विमानतळावरून मुंबई-पुणे टॅक्सी प्रवासात आता १०० रुपयांची वाढ