• Download App
    राजर्षि शाहूंच्या कोल्हापुरात रविवारी सामाजिक न्याय परिषदेचे आयोजनRajarshi Shahu organized Social Justice Conference in Kolhapur on Sunday

    राजर्षि शाहूंच्या कोल्हापुरात रविवारी सामाजिक न्याय परिषदेचे आयोजन

    प्रतिनिधी

    कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषद २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. विवेक विचार मंच सहयोगी संस्था आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सामजिक न्याय दिनाच्या’ औचित्याने ही एक दिवसीय परिषद होणार आहे. येत्या रविवारी २५ जूनला विद्यापीठातील राजर्षी शाहू सभागृहात सकाळी १० वाजता परिषदेचे उद्घाटन होणार आहे. कामगारमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. Rajarshi Shahu organized Social Justice Conference in Kolhapur on Sunday

    ▪️  डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टीचे महासंचालक सुनील वारे, विवेक विचार मंच आणि भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष माजी खासदार प्रदीप रावत, छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वंशज समरजितसिंह घाटगे, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू, प्रा. डॉ. डी. टी. शिर्के यावेळी उपस्थित राहणार आहेत.

    ▪️  बुलढाणा येथील दौलतराव खरात,बीड येथील वाल्मीक निकाळजे, नाशिक येथील योगेश शिंदे इचलकरंजी येथील प्रा. डॉ. अमर कांबळे यांना या परिषदेत राजर्षी छत्रपती शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्कार २०२३ने सन्मानित करण्यात येणार आहे.

    ▪️  विवेक विचार मंच ही संस्था महराष्ट्रात सामाजिक विषयात कार्यरत असून भारतीय संविधान तसेच विविध वैचारिक विषयात प्रबोधन तसेच सामाजिक न्यायाच्या विषयात काम करते. गेली तीन वर्षे राज्यस्तरावर सामाजिक न्याय परिषदेचे आयोजन केले जाते. या परिषदेत राज्यभरातून सामाजिक संस्था संघटनांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते सहभाग घेतात. भारतीय संविधानाला अपेक्षित सामजिक न्याय, समताधिष्ठित, बंधुभावपूर्ण समाजनिर्मितीच्या उद्देशाने सामाजिक न्याय परिषदेचे आयोजन केले जाते.या परिषदेला महाराष्ट्रातून साधारण २०० संस्था संघटनांचे ३५० प्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.

    ▪️ दिवसभराच्या परिषदेत एकूण तीन सत्र होणार आहेत. त्यात प्रामुख्याने वंचित घटकांचे समाजिक न्याय – हक्काचे प्रश्न, सामाजिक अन्याय अत्याचाराच्या आणि तणावाच्या घटना,विविध समस्या आणि त्यांचे निराकरण या अनुषंगाने मान्यवरांचे मार्गदर्शन तसेच चर्चा, संवाद होईल. दोन ठराव या परिषदेत पारित करणार आहेत.

    Rajarshi Shahu organized Social Justice Conference in Kolhapur on Sunday

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!