• Download App
    राज ठाकरेंच्या भाषणाचे कर्नाटकात पडसाद; मशिदींवरील भोंग्यांवर बंदीची हिंदुत्ववाद्यांची मागणी!! Raj Thackeray's speech resonates in Karnataka

    Raj Thackeray : राज ठाकरेंच्या भाषणाचे कर्नाटकात पडसाद; मशिदींवरील भोंग्यांवर बंदीची हिंदुत्ववाद्यांची मागणी!!

    प्रतिनिधी

    बेंगलुरू : मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या गुढीपाडव्या मेळाव्यातील भाषणाचे पडसाद महाराष्ट्रात तर उमटलेच पण त्या पलिकडे जाऊन अन्य राज्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर उमटले आहेत. मशिदींवरील भोंगे उतरवण्याचा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. आता तशीच मागणी कर्नाटकात बजरंग दल आणि श्रीराम सेना यांनी केली आहे Raj Thackeray’s speech resonates in Karnataka

    मशिदींवरील भोंग्यांच्या राज ठाकरेंच्या भाषणानंतर महाराष्ट्रातील राजकारण पेटले आहे. मनसेच्या नेत्यांनी मशिदींसमोर हनुमान चालिसा लावायला सुरुवात केली आहे. आता कर्नाटकातही त्याचे पडसाद पाहायला मिळत आहे. कर्नाटकातील श्रीराम सेना आणि बजरंग दल या हिंदू संघटनांनी मशिदींवरील भोंग्यांविरोधात आवाज उठवला आहे.



    तर स्पीकरवर भजने लावू

    ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार मशिदींवरील भोंग्यांवर बंदी घालावी, अशी मागणी श्रीराम सेनेच्या प्रमोद मुतालिक यांनी केली. न्यायालयानेही रात्री दहा ते सकाळी सहा स्पीकरच्या वापराला बंदी केली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. ‘शाळा, रुग्णालयांसारख्या शांतता परिसराबाबतचे आदेशही मशीद व्यवस्थापकांकडून धुडकावले जातात. त्यामुळे मशिदींवरील भोंगे उतरवले नाहीत, तर आम्ही सकाळी स्पीकरवर भजने लावू,’ असे मुतालिक यांनी म्हटले आहे.

    दोन समुदायांमध्ये संघर्ष

    राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्याची मागणी केली होती; तसेच स्पीकरवर हनुमान चालिसा लावणार असल्याचे म्हटले होते. मात्र, अशा पद्धतीने थेट रस्त्यावर भिडण्याची भाषा केल्यास त्यातून दोन समुदायामध्ये संघर्ष उद्भवू शकतो. त्यामुळेच मुस्लिम समाजाने मशिदीपुरताच लाउडस्पीकरचा वापर केल्यास त्याचा इतर नागरिकांना त्रास होणार नाही, असे कर्नाटकातील मंत्री के. एस.ईश्वरप्पा म्हणाले.

    Raj Thackeray’s speech resonates in Karnataka

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!