• Download App
    राज ठाकरेंची सभा, "निवडलेले" विषय; शिंदे - फडणवीसांनी योगी स्टाईल बुलडोझर चालविण्यासाठी ट्रिगर पॉईंट!! Raj Thackeray's speech is a trigger point for shinde Fadanavis government to take action with yogi style bulldozer against Muslim encroachments in maharashtra

    राज ठाकरेंची सभा, “निवडलेले” विषय; शिंदे – फडणवीसांनी योगी स्टाईल बुलडोझर चालविण्यासाठी ट्रिगर पॉईंट!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राज ठाकरेंची गुढीपाडव्याची सभा त्यांनी “निवडलेले” विषय हे नीट लक्षात घेतले, तर महाराष्ट्रात शिंदे – फडणवीस यांनी योगी स्टाईल बुलडोझर चालवण्यासाठी ट्रिगर पॉइंट ठरल्याचे दिसून येत आहे. Raj Thackeray’s speech is a trigger point for shinde Fadanavis government to take action with yogi style bulldozer against Muslim encroachments in maharashtra

    मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईच्या शिवतीर्थावरील गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मुंबई आणि महाराष्ट्रातील मुस्लिम अतिक्रमण विरुद्ध आणि मशिदींवरील भोंग्यांविरोधात पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. राज ठाकरेंनी सहाच महिन्यांपूर्वी मशिदींवरील भोंग्याचा विषय उचलला होता आणि त्यानंतर लगेच मशिदींवरचे भोंगे फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर उत्तर प्रदेशात देखील उतरले होते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ते काम चोख केले होते. एक प्रकारे राज ठाकरेंच्या भूमिकेने महाराष्ट्रासह उत्तर प्रदेशाला मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी ट्रिगर पॉइंट मिळाला होता.



    आता गुढीपाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी मुस्लिम अतिक्रमण आणि पुन्हा मशिदींवरचे भोंगे हे निवडलेले विषय यातून शिंदे – फडणवीस सरकारला मोठाच ट्रिगर पॉईंट मिळाला आहे. शिंदे – फडणवीस सरकारने प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेले अफजलखानाच्या कबरी भोवतालचे अतिक्रमण योगी स्टाईल बुलडोझर चालवून तोडले. त्याबद्दल राज ठाकरेंनी दोघांचे अभिनंदन केले, पण त्याच वेळी त्यांनी माहीम समुद्रातल्या मधल्या मुस्लिम दर्गा अतिक्रमणाचा विषय काढून शिंदे – फडणवीस सरकारला इशाराही देऊन टाकला. नेमका हाच तो शिंदे फडणवीस सरकार साठी योगी स्टाईल चालवण्याचा ट्रिगर पॉईंट आहे!!

    राज ठाकरेंनी केवळ माहीमच्या समुद्रातील मुस्लिम दर्ग्याच्या अतिक्रमणाचा विषय काढला असे नव्हे, तर सांगली जिल्ह्यातील कुपवाड मधील मंगलमूर्ती कॉलनीतील मुस्लिम गुंडांच्या अतिक्रमणाचाही विषय व्हिडिओ लावून काढला आहे. महाराष्ट्रात शेकडो नव्हे, हजारो शहरा गावांमध्ये अशा पद्धतीची अतिक्रमणे आहेत. त्या अतिक्रमणकर्त्यांसाठी राज ठाकरेंचा हा इशारा आहे, तर तिथल्या हिंदू रहिवाशांसाठी हा दिलासा आहे.

    आता शिंदे – फडणवीस सरकार या ट्रिगर पॉइंटचा उपयोग करून महाराष्ट्रातल्या गावागावातील, शहरा शहरांमधील ही मुस्लिम अतिक्रमणे कशा पद्धतीने हटविणार याकडे महाराष्ट्रातल्या नव्हे, तर संपूर्ण देशातल्या हिंदू समाजाचे लक्ष लागले आहे!!

    Raj Thackeray’s speech is a trigger point for shinde Fadanavis government to take action with yogi style bulldozer against Muslim encroachments in maharashtra

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा