• Download App
    ‘’... तर मणिपूरच नव्हे तर ईशान्य भारतात, देशापासून विभक्त होण्याचा विचार जोर पकडेल’’ Raj Thackerays letter to Prime Minister Modi and Home Minister Amit Shah on Manipur violence

    ‘’… तर मणिपूरच नव्हे तर ईशान्य भारतात, देशापासून विभक्त होण्याचा विचार जोर पकडेल’’

    राज ठाकरेचं विधान; पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाहांना पाठवले पत्र

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई :  मणिपूरमध्ये मागील अनेक दिवसांपासून हिंसाचार उफाळलेला असून, अद्यापही तो पूर्णपणे शमलेला नाही. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार व मणिपूरचे राज्य सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे विरोधक या मुद्य्यावरून केंद्र सरकारला कोंडीत पकडत आहेत. अशात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना एक पत्र पाठवून आपली भूमिका मांडत, भीतीही व्यक्त केली आहे.  Raj Thackerays letter to Prime Minister Modi and Home Minister Amit Shah on Manipur violence

    अशांत मणिपूरमधील हिंसाचारामुळे दुखावलेल्या लोकांच्या मनांवर फुंकर नाही घातली तर मणिपूरच नव्हे तर ईशान्य भारतात, देशापासून विभक्त होण्याचा विचार जोर पकडेल आणि त्याला सरकार जबाबदार असेल. म्हणून माझी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणि गृहमंत्री अमित शाह ह्यांना विनंती आहे की, ठोस पावलं उचला, मणिपूर पूर्ववत होईल हे पाहा. असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

    याशिवाय राज ठाकरे पत्रात म्हणाले आहेत की, “ईशान्य भारतातील मणिपूर हे राज्य शब्दश: असंतोषाने धुमसतंय. केंद्रातील भारतीय जनता पार्टीच्या एका मंत्र्याच्या घरावरच लोकांनी संतापाने हल्ला चढवला, इथपर्यंत परिस्थिती रसातळाला गेली आहे. हे सगळं गेल्या दोन महिन्यांपासून सुरू आहे आणि तरीही परिस्थिती आटोक्यात आणण्यात केंद्र सरकारला अपयश का येतंय? हेच कळत नाही.”

    याचबरोबर “ईशान्य भारताकडे काँग्रेसने साफ दुर्लक्ष केलं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेसला दूषणं द्यायचे. पण आज त्यांच्याच कार्यकाळात ईशान्य भारतातील एक राज्य धुमसत असताना, त्यांनी मौन का बाळगलं आहे, हे माझ्यासाठी अनाकलनीय आहे. मध्यंतरी देशाचे गृहमंत्री अमित शाह  हे चार दिवस मणिपूरमध्ये राहिले होते, तरीही परिस्थिती आटोक्यात का आली नाही? ह्या विषयावर काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने चिंता व्यक्त केली होती. किमान त्यानंतर तरी पंतप्रधानांकडून ठोस कृती होईल.’’ असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

    याशिवाय, “मणिपूरचं सध्याचं नेतृत्व जर परिस्थिती हाताळायला निष्प्रभ ठरत असेल तर योग्य तो निर्णय भारतीय जनता पार्टीच्या शीर्ष नेतृत्वाने घ्यावा. ईशान्यकडील राज्यांना प्रवाहात आणण्यासाठी अटल बिहारी वाजपेयी यांनी खूप प्रयत्न केले होते. पण सध्या मणिपूरकडे ज्या पद्धतीने दुर्लक्ष होत आहे, ते पाहून वाजपेयींचे सर्व प्रयत्न वाया जातील, अशी भीती वाटते. वेळीच मणिपूर शांत करून तिथल्या दुखावलेल्या लोकांच्या मनांवर फुंकर नाही घातला तर मणिपूरच नव्हे तर ईशान्य भारतात देशापासून विभक्त होण्याचा विचार जोर पकडेल आणि त्याला सरकार जबाबदार असेल. म्हणून माझी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना विनंती आहे की, ठोस पावलं उचला आणि मणिपूर पूर्ववत होईल, ते पाहा.” अशी भीतीही राज ठाकरेंनी व्यक्त केली आहे.

    Raj Thackerays letter to Prime Minister Modi and Home Minister Amit Shah on Manipur violence

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस