Tuesday, 6 May 2025
  • Download App
    अमित ठाकरेंच्या दौऱ्यात मनसैनिकांनी टोलनाका फोडल्याच्या घटनेवर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले... Raj Thackerays first reaction to the incident of Mansainiks breaking toll booths during Amit Thackerays  Tour

    अमित ठाकरेंच्या दौऱ्यात मनसैनिकांनी टोलनाका फोडल्याच्या घटनेवर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

    त्याची जबाबदारी भाजपा किंवा सरकार घेणार आहे का? असा सवालही केला आहे.

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : मनसे नेते अमित ठाकरे उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. शनिवार ते अहमदनगर आणि शिर्डीला गेले होते. समृद्धी महामार्गावरून नाशिककडे परतत असताना सिन्नर तालुक्यातील टोलनाक्यावर अमित ठाकरे यांची कार कर्मचाऱ्यांनी अडवली. त्यानंतर मनसेच्या संतप्त पदाधिकाऱ्यांनी या टोलनाक्याची तोडफोड केली होती. आता यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. Raj Thackerays first reaction to the incident of Mansainiks breaking toll booths during Amit Thackerays  Tour

    राज ठाकरे म्हणतात, ‘’अमितचा महाराष्ट्र दौरा सुरु आहे… टोलवर जी मुजोरी दाखवली गेली त्यातून हे घडलं पण भाजपाने ९ वर्षांपूर्वी आश्वासन दिलं होतं कि ‘टोलमुक्त महाराष्ट्र करू’ त्याचं काय झालं? अजूनही टोलधाड का सुरू आहे? समृद्धी महामार्गावर अजूनही पुरेशा सुविधा का नाहीत? समृद्धी महामार्गावर भरभक्कम टोलवसुली सुरु आहे मग त्या अपुऱ्या सुविधांमुळे अपघातात जे लोक मृत्युमुखी पडत आहेत, त्याची जबाबदारी भाजपा किंवा सरकार घेणार आहे का?’’

    याचबरोबर, ‘’मुंबई-गोवा महामार्ग बांधणीला १७ वर्ष लागतात? अजूनही ते काम अपूर्णच आहे. आश्चर्य एका गोष्टीचं वाटतं की केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री मराठी असूनही महाराष्ट्राच्या रस्त्यांची अशी दुरावस्था झाली आहे. हे सरकारचं, मंत्र्यांचं अपयश नाही का?’’ असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

    नेमकं काय घडलं?

    महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमीत ठाकरे आणि मनसेचे वरिष्ठ पदाधिकारी शनिवारी (दि. २२) शिर्डीमार्गे समृद्धी महामार्गावरून सिन्नरकडे येत असताना सिन्नर येथील समृद्धी महामार्गाच्या गोंदे टोल नाक्यावर त्यांचा ताफा अडवण्यात आला. त्यांनी ओळख देऊनही टोलनाका प्रशासनाने आर्धा तास थांबून ठेवले. टोल उतरून संगमनेर कडे रवाना झाल्यानंतर मनसेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सिन्नर आणि नाशिकच्या पदाधिकाऱ्यांना या संदर्भात माहिती दिली.

    उपजिल्हाध्यक्ष शैलेश येलमामे, तालुकाध्यक्ष विलास सांगळे, तालुका संघटक चेतन दराडे, तालुका उपाध्यक्ष कृष्णा पालवे, रामदास खैरनार, शहर सरचिटणीस अमित कांबळे, अस्मिता सरवार यांनी रात्री ११ वाजेच्या सुमारास टोल नाक्यावर जाऊन अमित ठाकरे यांना अपमानास्पद वागणूक दिल्याबद्दल व्यवस्थापनाला जाब विचारला. सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे यांच्या उपस्थितीत टोलनाका प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केल्यानंतर या विषयावर पडदा पडला.

    मात्र नाशिक येथील पदाधिकाऱ्यांच्या मनात राग कायम राहिल्याने त्यांनी रात्री २ वाजेच्या सुमारास येत टोलनाक्याच्या केबिनच्या काचा फोडल्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो, अशा घोषणा देत हातातील दांडक्याने केबिनच्या काचा फोडून मनसैनिक तेथून पसार झाले.

    Raj Thackerays first reaction to the incident of Mansainiks breaking toll booths during Amit Thackerays  Tour

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Devendra Fadnavis आगामी पाच वर्षांत महाराष्ट्राला पर्यटन क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आणण्याचा प्रयत्न – मुख्यमंत्री फडणवीस

    जहाल माओवादी प्रशांत कांबळे उर्फ लॅपटॉपला तब्बल 15 वर्षांनी पुण्यात अटक; ATS ची कारवाई!!

    “नरकातला स्वर्ग” पुस्तकाच्या प्रकाशनाचे निमंत्रण देण्यासाठी संजय राऊत शरद पवारांच्या घरी; स्वतः पवारांनीच दिली माहिती!!