• Download App
    जागितक महिला दिनानिमित्त राज ठाकरेंचे समस्त महिलावर्गास आवाहन, म्हणाले...Raj Thackerays appeal to all women on the occasion of International Womens Day

    जागितक महिला दिनानिमित्त राज ठाकरेंचे समस्त महिलावर्गास आवाहन, म्हणाले….

    महिला दिनानिमित्त सर्वचजण विविध माध्यमांद्वारे शुभेच्छा देत आहेत याचबरोबर अनेक मुद्देही चर्चिले जात आहेत.

    प्रतिनिधी

    जागतिक महिला दिन आज सर्वत्र विविध प्रकारे साजरा केला जात आहे. सर्वचजण महिला दिनानिमित्त शुभेच्छा देत आहेत. या निमित्त महिला सबलीकरण, स्त्री शिक्षण, महिलांचा सर्वांगिण विकास, महिलांचे आरोग्य आदी अनेक मुद्दे चर्चिले जात आहेत. याच  पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. याचबरोबर त्यांनी समस्त महिला वर्गासाठी एक पत्र लिहून त्यांना आवाहनही केले आहे. Raj Thackerays appeal to all women on the occasion of International Womens Day

    राज ठाकरे आपल्या पत्रात लिहितात, ‘’ आज जागतिक महिला दिन. सर्वप्रथम तमाम स्त्रीवर्गाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनःपूर्वक शुभेच्छा. सगळ्या चौकटी मोडून, आज सर्वच क्षेत्रामंध्ये स्त्रियांची जी घौडदौड सुरु आहे ती थक्क करणारी आहे. आज ग्रामीण भागातील असो की शहरी भागातील, इथल्या मुलींना उच्च शिक्षणाची,  स्वतःच करिअर घडवायची प्रचंड ओढ आहे. आणि त्यासाठी त्या घरापासून लांब, इतर शहरांत किंवा परदेशांत नोकरी, शिक्षणाच्या निमित्ताने सहज स्थिरावत आहेत, आणि जिथे जातील तिथे स्वतःचा ठसा उमटवत आहेत. हे चित्र आनंददायी आहे.’’


    आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त बंगळुरू, राजस्थानमध्ये महिलांना मोफत बस प्रवास


    याचबरोबर ‘’१००, १५० वर्षांपूर्वी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळावा म्हणून प्रचंड संघर्ष करावा लागत होता अशी परिस्थिती होती आणि त्याच समाजात मोठमोठ्या उद्योगसमूहांच्या व्यवस्थापनापासून ते जागतिक अर्थकारणात उलाढाली करणाऱ्या संस्थांमध्ये मोठ्या पदांवर स्त्रिया कार्यरत आहेत.’’ असंही राज ठाकरे सांगतात.

    याशिवाय ‘’इतकंच काय देशाची अर्थव्यवस्था,  परराष्ट्र व्यवहार,  सीमांचं संरक्षण ते थेट राष्ट्रपतीपदी स्त्रिया आपला ठसा उमटवत आहेत आणि हे सर्व त्यांनी निव्वळ स्वकर्तृत्वावर कमावलं आहे. म्हणूनच स्त्रियांनी आता राजकारणात देखील मोठ्या प्रमाणावर यायला हवं. ‘जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवणं’ हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं ध्येय आहे, आणि हे साध्य करायचं असेल तर स्त्रियांचा सहभाग देखील तितकाच महत्वाचा आहे, ह्याची आम्हाला जाणीव आहे. म्हणूनच विविध क्षेत्रांत स्वतःला सिद्ध करणाऱ्या स्त्रियांनी राजकारणात यावं, त्यांना संधी देण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना उत्सुक आहे.  पुन्हा एकदा सर्व महिलांना, जागतिक महिला दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.’’ अशा शब्दांमध्ये राज ठाकरे यांनी जागतिक महिला दिनानिमित्त समस्त महिलावर्गास शुभेच्छा दिल्या आहेत.

    Raj Thackerays appeal to all women on the occasion of International Womens Day

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस