• Download App
    आपली कृती पक्ष बांधिलकीचा वस्तुपाठ!!; मित्र राज ठाकरेंचे देवेंद्रजींना खुले पत्र...वाचा जसेच्या तसे!! Raj Thackeray writes open letter to devendra Fadanavis

    आपली कृती पक्ष बांधिलकीचा वस्तुपाठ!!; मित्र राज ठाकरेंचे देवेंद्रजींना खुले पत्र…वाचा जसेच्या तसे!!

    प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्रातील सत्तांतर नाट्यात अनेक वळसे वळणे येऊन देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पद स्वीकारावे लागले या मुद्द्यावरून महाराष्ट्रात राजकीय वर्तुळात खल होत असताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांना खुले पत्र लिहिले आहे. हे पत्र जसेच्या तसे… Raj Thackeray writes open letter to devendra Fadanavis

    १ जुलै २०२२

    श्री. देवेंद्र फडणवीस उप-मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

    यांसी सस्नेह जय महाराष्ट्र!

    प्रिय देवेंद्रजी,

    सर्वप्रथम महाराष्ट्राचे उप-मुख्यमंत्री म्हणून आपण जबाबदारी स्विकारल्याबद्दल आपले मन:पूर्वक अभिनंदन. वाटलं होतं की तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणूनच पुन्हा परताल, परंतु ते व्हायचं नव्हतं. असो…

    तुम्ही ह्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सलग पाच वर्ष काम केलेत. आत्ताचं सरकार आणण्यासाठीही अपार कष्ट तुम्ही उपसलेत आणि इतकं असूनही आपल्या मनातील हुंदका बाजूला सारून, पक्षादेश शिरसावंद्य मानून उप-मुख्यमंत्रीपदाची सूत्रं हातात घेतलीत. पक्ष, पक्षाचा आदेश हा कुठल्याही व्यक्तीच्या आकांक्षेपेक्षा मोठा आहे हे तुम्ही तुमच्या कृतीतून दाखवून दिलं. पक्षाशी बांधीलकी म्हणजे काय असतं त्याचा हा वस्तुपाठच आहे. ही गोष्ट देशातल्या आणि राज्यातल्या सर्व राजकीय पक्षातील आणि संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी कायमस्वरूपी लक्षात ठेवण्यासारखी आहे. खरोखरच अभिनंदन!

    आता जरा आपल्यासाठी

    ही बढती आहे की अवनती ह्यात मी जात नाही आणि कुणी जाऊही नये. पण एक सांगतो की, धनुष्यातून ध्येयाचा वेध घ्यायचा तर दोरी मागे ओढावी लागते. ह्या मागे ओढलेल्या दोरीला कुणी माघार म्हणत नाही! तुम्हाला ह्या पुढेही बराच राजकीय प्रवास करायचा आहे.

    एक निश्चित की तुम्ही तुमचं कर्तृत्व महाराष्ट्रापुढे सिध्द केलेलंच आहे त्यामुळे देशाच्या भल्यासाठीही तुम्हाला अधिक काम करण्याची संधी मिळो हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना.

    पुन्हा एकदा तुमचं मनःपूर्वक अभिनंदन!

    आपला मित्र,

    राज ठाकरे

    Raj Thackeray writes open letter to devendra Fadanavis

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस