विशेष प्रतिनिधी
पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातिवादी विचार वाढविण्यात आला या आरोपाचा पुनरूच्चार राज ठाकरे यांनी आज पुण्याच्या पत्रकार परिषदेत केला. याच पत्रकार परिषदेत त्यांनी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना प्रत्युत्तर दिले. ज्यांचे मूळात आकलन नाही, त्यांना मी काय उत्तर द्यायचे? मला मोजण्याचा प्रयत्न करू नका, अशा शब्दांत त्यांनी संभाजी ब्रिगेडच्या आरोपांचा समाचार घेतला. Raj Thackeray target Sambhaji Brigade also in pune press conference
प्रवीण गायकवाड यांनी एक फेसबुक पोस्ट लिहून राज ठाकरेंना इतिहासाचे आकलन नसल्याची टीका केली होती. या टीकेला आता राज यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, की मूळात ज्याचे काही आकलनच नाही त्याच्याबद्दल काय बोलायचे? मी काय वाचतो आणि मी काय वाचलेय हे मला चांगले माहिती आहे. माझ्या पक्षाला आणि सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे मला मोजण्याचा प्रयत्न करू नये,’ अशा शब्दांत राज ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेडवर निशाणा साधला.
राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातिवाद वाढल्याच्या आरोपाचा पुनरूच्चार केला. ते म्हणाले की त्यांच्या राजकीय फायद्यासाठी ठरवून जाती-जातीमध्ये भांडणे लावली जात आहेत. मी त्यादिवशी म्हणालो होतो की आता कुठे आहे जेम्स लेन? नेमका तेव्हाच कसा तो आला आणि आग लावून निघून गेला? यामागे मोठे षडयंत्र आहे. ज्यांना जातिवादी राजकारण करायचे आहे त्यांचे एजंट असले जाती जातींमध्ये भांडणे लावण्याची कामे करत असतात, असा टोलाही राज ठाकरे यांनी लगावला.
Raj Thackeray target Sambhaji Brigade also in pune press conference
महत्त्वाच्या बातम्या
- इंस्टाग्राम आणि फेसबुकने राहुल गांधींची पोस्ट हटवली, दिल्ली बलात्कार पीडितेच्या आईवडिलांचा फोटो केला होता शेअर
- Maria Andrejczyk : पोलंडच्या ऑलिम्पिक खेळाडूने रौप्य पदकाचा केला लिलाव, मिळालेल्या पैशांतून आजारी मुलांवर शस्त्रक्रिया
- Childrens Vaccine : जॉन्सनने भारतात चाचणीसाठी मागितली परवानगी, 12 ते 17 वर्षांच्या मुलांवर होणार परीक्षण
- पंतप्रधान मोदी म्हणाले, दहशतवादाने श्रद्धा दडपली जाऊ शकत नाही, सोमनाथ मंदिर आमच्या श्रद्धेचे प्रेरणास्थान !
- तालिबानने कंधार आणि हेरातमधील भारतीय दूतावासात कुलूप तोडून केला प्रवेश, कार्यालयांची घेतली झडती