• Download App
    प्रबोधनकारांच्या ग्रंथ प्रकाशन कार्यक्रमाला राज ठाकरेंना देखील बोलवा, आशिष शेलारांच थेट मुख्यमंत्र्यांना पत्रRaj Thackeray should also be invited to Prabodhankar's book publishing program, Ashish Shelaran's direct letter to CM

    प्रबोधनकारांच्या ग्रंथ प्रकाशन कार्यक्रमाला राज ठाकरेंना देखील बोलवा, आशिष शेलारांच थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

    या कार्यक्रमासाठी विरोधी पक्षनेत्यांना आमंत्रित करण्यात आलेलं नाही. त्याबद्दलही शेलारांनी नाराजी व्यक्त केली आहे.Raj Thackeray should also be invited to Prabodhankar’s book publishing program, Ashish Shelaran’s direct letter to CM


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : आसजपचे नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. ‘प्रबोधनमधील प्रबोधनकार’या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यावेळी राज ठाकरेंना आमंत्रित करायला हवं होतं, असं मत शेलारांनी पत्रातून व्यक्त केलं आहे.

    या कार्यक्रमासाठी विरोधी पक्षनेत्यांना आमंत्रित करण्यात आलेलं नाही. त्याबद्दलही शेलारांनी नाराजी व्यक्त केली आहे. या कार्यक्रमाला प्रथेप्रमाण विरोधी पक्षनेत्यांना आमंत्रित केलं असतं, तर अधिक आनंद झाला असता अस देखील आशिष शेलार पत्रात म्हणाले.



    ज्या ज्या वेळी राज ठाकरे यांना भेटतो, त्या त्या वेळी त्यांच्या तोंडून प्रबोधनकारांचे ज्याज्वल्य विचार ऐकायला मिळतात. अद्यापही या कार्यक्रमाच निमंत्रण त्यांना देता येईल. या व्यासपीठावर राज ठाकरे आले तर एक संस्मरणीय सोहळा महाराष्ट्राला पाहता येईल, असं शेलारांनी पत्रात म्हटलं आहे.

    प्रबोधनमधील प्रबोधनकार या ग्रंथ प्रकाशनावरून नाराजीनाट्य रंगण्याची सुरूवात झाली आहे. विरोधीपक्ष नेत्याला निमंत्रण नाही ते ठिकय पण किमान प्रबोधनकारांच्या विचारांचा वारसा आणि व्यासंग असणाऱ्या राज ठाकरे यांना बोलवायला हवं, असं आशिष शेलार म्हणाले.

    Raj Thackeray should also be invited to Prabodhankar’s book publishing program, Ashish Shelaran’s direct letter to CM

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    अमेरिका + पाकिस्तान यांनीच ceasefire शब्द वापरला; भारताने फक्त firing आणि military action थांबविल्याचे सांगितले; याचा नेमका अर्थ काय??

    Indian Army पाकिस्तानचे कंबरडे मोडल्यानंतरच भारताने सध्या थांबविले फायरिंग; भारतीय सैन्य दलांचा स्पष्ट खुलासा; शस्त्रसंधी शब्द नाही वापरला!!

    Operation sindoor : भारत – पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा, पण फक्त फायरिंग थांबवल्याचा भारताचा खुलासा!!