• Download App
    Raj Thackeray : संभाजीनगरच्या सभेला अटी शर्तींवर परवानगी; पण सभा उधळण्याची भीम आर्मीची धमकी!! । Raj Thackeray: Sambhajinagar meeting allowed on conditional terms; But Bhim Army threatens to disrupt the meeting !!

    Raj Thackeray : संभाजीनगरच्या सभेला अटी शर्तींवर परवानगी; पण सभा उधळण्याची भीम आर्मीची धमकी!!

    विशेष प्रतिनिधी

    संभाजीनगर : मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सभेला पोलीस परवानगी देण्याच्या स्थितीत आहेत, पण काही अटी शर्तींवर!! या अटी शर्ती मनसेने पाळल्या तरच सभेला परवानगी देता येईल अन्यथा गुन्हे दाखल करावे लागतील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. Raj Thackeray: Sambhajinagar meeting allowed on conditional terms; But Bhim Army threatens to disrupt the meeting !!

    या अटी शर्ती मध्ये लहान मुले – महिलांना त्रास होऊ नये, आवाजाची मर्यादा पाळावी, सभेत येण्यापूर्वी कोणतीही रॅली काढता येणार नाही, त्याचबरोबर सभेत घोषणा देता येणार नाहीत, समाजामध्ये तेढ निर्माण निर्माण करणारी वक्तव्ये करता कामा नये, कोणतेही धार्मिक चिथावणीखोर वक्तव्य करता कामा नये, अशा सर्वसाधारण अटी व शर्ती पोलिसांनी लादल्याच्या बातम्या आहेत.



    परंतु या पार्श्वभूमीवर एक वेगळीच बातमी संभाजीनगर मधून समोर आली आहे, ती म्हणजे भीम आर्मी मने राज ठाकरे यांची सभा उधळून लावण्याची धमकी दिली आहे. जो पक्ष फुले शाहू आंबेडकरांचे विचार मानत नाही. समाजात धार्मिक तेढ पसरवतो. त्या पक्षाची सभा आम्ही होऊ देणार नाही, असे भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. यामुळे संभाजीनगर मध्ये आता नवीनच संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे.

    एकीकडे राज ठाकरे महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर तोफा डागत असताना दुसरीकडे भीम आर्मीच्या रूपाने मनसेचा नवीन विरोधक तयार झाल्याचे चित्र संभाजीनगर मध्ये दिसू लागले आहे. आता भीम आर्मीच्या या धमकीला मनसे कडून कसे प्रत्युत्तर दिले जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्याचबरोबर संभाजीनगर मध्ये कायदा आणि सुव्यवस्था टिकवून ठेवणे यामध्ये पोलिसांची कसोटी लागणार आहे.

    Raj Thackeray : Sambhajinagar meeting allowed on conditional terms; But Bhim Army threatens to disrupt the meeting !!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस