Thursday, 1 May 2025
  • Download App
    महाराष्ट्रासाठी राज ठाकरे यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून केल्या ५ मागण्या | raj thackeray putforth 5 demands in a letter to PM narendra modi

    महाराष्ट्रासाठी राज ठाकरे यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून केल्या ५ मागण्या

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई – वाढता कोविड – अपूरी यंत्रणा या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र यांना पत्र लिहून राज्यातील स्थितीचा आढावा घेत काही महत्त्वपूर्ण मागण्या केल्या आहेत. raj thackeray putforth 5 demands in a letter to PM narendra modi

    ‘देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून महाराष्ट्राला या व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. सर्वाधिक रुग्ण आणि सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रातच झाले आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या वाढत असताना लॉकडाऊनसारखे पर्याय अवलंबले जात आहेत.



    ते आता राज्याला परवडणारे नाहीत. मात्र राज्याला लसींचा पुरवठा होत नसल्याने पर्याय तरी काय उरतो?’ असे म्हणत राज ठाकरे यांनी कोरोना लसी आणि इतर सुविधा यांबाबत पंतप्रधान मोदी यांच्याकडे 5 मागण्या केल्या आहेत.

    • महाराष्ट्राला स्वतंत्रपणे लसी खरेदी करण्याची परवानगी द्यावी
    • सिरमला महाराष्ट्रात स्वतंत्रपणे लस विकण्याची परवानगी द्यावी
    • राज्यातील इतर खासगी संस्थांना लस खरेदी करण्याची परवानगी द्यावी
    • लसीचा पुरवठा वेळेत व्हावा यासाठी हॉपकिन्स आणि हिंदुस्थान अँटिबायोटिकला लस उत्पादन करण्याची मुभा द्यावी
    • राज्याला प्राणवायू आणि रेमडेसिवीर यांचा आवश्यक पुरवठा करता यावा म्हणून मोकळीक द्यावी अशीही विनंती.

    या त्या ५ मागण्या आहेत.

    मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आपल्या कालच्या संबोधनात पंतप्रधानांकडे लोकांना वैयक्तिक मदतीची मागणी करणार असल्याचे स्पष्ट केले होते. तसेच कोरोनाला नैसर्गिक आपत्ती मानून त्या निकषांनुसार लोकांना वैयक्तिक मदत देण्यात यावी, असाही मुख्यमंत्र्यांच्या मागणीचा सूर होता.

    raj thackeray putforth 5 demands in a letter to PM narendra modi


    विशेष बातम्या

    Related posts

    CM Fadanvis : राज्यभरातील धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत समाधानकारक पाणीसाठा

    Devendra Fadnavis : निधी वाटपात अजितदादांच्या “दादागिरीला” फडणवीसांचा चाप; मंत्र्यांची समिती नेमून ठेवणार “वॉच”!!

    Devendra Fadanvis : मूल्याधारित शिक्षणासाठी शांतीलाल मुथ्था फाऊंडेशनबरोबर शालेय शिक्षण विभागाचा सामंजस्य करार