• Download App
    Raj Thackeray : मनसेचा सभेचा निर्धार; बाळा नांदगावरकर संभाजीनगरमध्ये, पण पोलीसांचा उद्या निर्णय|Raj Thackeray: MNS meeting decision; Bala Nandgaonkar in Sambhajinagar, but police decision tomorrow

    Raj Thackeray : मनसेचा सभेचा निर्धार; बाळा नांदगावरकर संभाजीनगरमध्ये, पण पोलीसांचा उद्या निर्णय

    प्रतिनिधी

    संभाजीनगर : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आधी जाहीर केल्याप्रमाणे 1 मे महाराष्ट्र दिनी संभाजीनगर मध्ये जाहीर सभा घेणार आहेत.या सभेसाठी मनसे पदाधिकारी सज्ज झाले आहेत. या सभेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मनसे नेते बाळ नांदगावकर बुधवारी शहरात दाखल झाले आहेत. यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले.Raj Thackeray: MNS meeting decision; Bala Nandgaonkar in Sambhajinagar, but police decision tomorrow

    शहरात दाखल झाल्यानंतर बाळा नांदगावकर यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन राज ठाकरे यांच्या सभेसाठी परवानगी मागितली. यावेळी नांदगावकर स्वतः मराठवाडा सांस्कृतिक मंडळ या मैदानाची पाहणी केली. त्यानंतर पोलीसांनी देखील मैदानाची पहाणी केली असून सभेचा निर्णय पोलीस उद्या देणार आहेत. पोलिस या सभेला परवानगी निश्चित देतील, असा विश्वास बाळा नांदगावकरांनी व्यक्त केला आहे.



    राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी ३ मेपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. यानंतरही ज्या मशिदीवर भोंगे वाजतील त्या मशिदीसमोर हनुमान चालिसा वाजणार, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. आता मनसे कार्यकर्त्यांनी भोंगे खरेदीला सुरवात केली आहे.

    पुण्याहून ५० हून अधिक भोंगे सभेसाठी खरेदी केल्याची माहिती मनसेच्या नेत्यांनी दिली. इतकेच नाही औरंगाबादेतील पदाधिकाऱ्यांनी 1500 ते 1800 रुपये दराने पुण्यातून 50 पेक्षा अधिक भोंग्यांची खरेदी केली आहे. तसेच हे भोंगे बॅटरीवर चालणारे असून या भोंग्यांसाठी वीज लागत नाही.

    मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेला पाच दिवस बाकी असताना अद्याप पोलिसांनी या सभेसाठी मनसेला परवानगी दिलेली नाही. शहरात जमावबंदी लागू केल्याचे सांगितले जात होते. या आदेशानंतर सभेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. परंतु, जमावबंदी लागू करण्यात आल्याचे वृत्त चुकीचे असल्याची माहिती औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी दिली.

    Raj Thackeray: MNS meeting decision; Bala Nandgaonkar in Sambhajinagar, but police decision tomorrow

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस