• Download App
    Raj Thackeray : मशिदींवरले भोंगे उतरवले; राज ठाकरेंकडून योगींचे अभिनंदन!!; ठाकरे - पवारांना टोला!! । Raj Thackeray: Buzzers dropped on mosques; Congratulations to Yogi from Raj Thackeray !!; Thackeray - Tola to Pawar !!

    Raj Thackeray : मशिदींवरले भोंगे उतरवले; राज ठाकरेंकडून योगींचे अभिनंदन!!; ठाकरे – पवारांना टोला!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : उत्तर प्रदेशात 11000 मशिदींवरचे अनधिकृत भोंगे उतरवले. 35000 भोंग्यांचे आवाज कमी केले. या राजकीय कर्तृत्वाबद्दल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी खास अभिनंदन केले आहे. आपल्या ट्विटर हँडलवर खास ट्विट करून त्यांनी योगींचे आभार देखील मानले आहेत. त्याच वेळी शेलक्या शब्दात त्यांनी ठाकरे पवार सरकारला टोला देखील हाणला आहे. Raj Thackeray: Buzzers dropped on mosques; Congratulations to Yogi from Raj Thackeray !!; Thackeray – Tola to Pawar !!



    उत्तर प्रदेशात धार्मिक स्थळांवरचे विशेषत: मशिदींवरचे भोंगे उतरवले त्याबद्दल उत्तर प्रदेश सरकारचे खास अभिनंदन आणि आभार. पण महाराष्ट्रात “योगी: कोणीच नाही. आहेत ते फक्त सत्तेचे “भोगी”!! महाराष्ट्र सरकारला लवकरच सद्बुद्धी होऊ दे, अशी आई जगदंबे भचरणी प्रार्थना, अशा शब्दांमध्ये राज ठाकरे यांनी ट्विट करून योगी सरकारचे अभिनंदन करून ठाकरे – पवारांना टोला हाणला आहे.

    अजून तीनच दिवसांनी म्हणजे 1 मे महाराष्ट्र दिन राज ठाकरे यांची संभाजीनगर मध्ये जाहीर सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर मनसे महाराष्ट्रात वातावरण निर्मिती करत आहे. या दृष्टीने राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटर हँडलवर योगी सरकारचे अभिनंदन करणे आणि त्याच ट्विट मध्ये ठाकरे – पवारांना टोला हाणणे यातून मनसेची आक्रमक भूमिका अधिक ठळक करण्याचा इरादा स्पष्ट होताना दिसतो आहे.

    Raj Thackeray : Buzzers dropped on mosques; Congratulations to Yogi from Raj Thackeray !!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा