विशेष प्रतिनिधी
मुंबई : उद्योगपती राज कुंद्राने सुरू केलेल्या ‘हॉटशॉट’ या अॅप्लिकेशनचे आर्थिक उत्पन्न हे प्रामुख्याने अॅपल आणि गुगलकडून येत होते. लॉकडाऊनच्या काळातही या अॅप्लिकेशनने तीन महिन्यांत दीड लाख डॉलर्सची म्हणजे तब्बल एक कोटी १७ लाखांची कमाई केली. Raj kundra get money in lockdown too
मुंबई पोलिसांनी राज कुंद्रासह त्याच्या घराची झडती घेतली. या प्रकरणात कुंद्राची पत्नी आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचीही चौकशी केली होती. त्याच्या घरात पोलिसांना नऊ फायलींसह काही इलेकट्रॉनिक पुरावेदेखील सापडले आहेत. त्याची फॉरेन्सिक ऑडिटरकडून तपासणी केली जात आहे.
‘हॉटशॉट’ ॲप्लिकेशनसाठी काम करणाऱ्या साक्षीदार महिलेने दिलेल्या जबाबानुसार हॉटशॉटचे उत्पन्न हे प्रामुख्याने अॅपल आणि गुगलकडून येत होते. तसेच लॉकडाऊनमध्ये अन्य उद्योगधंद्यांवर परिणाम झाला असतानाही हॉटशॉट कंपनीने ऑगस्ट ते डिसेंबर २०२० या कालावधीत एक कोटी १७ लाख रुपयांची कमाई केली होती, परंतु पुढे गुगलने ‘हॉटशॉट’चे खाते बंद केल्याचे आरोपी रेयान थॉर्पने जबाबात सांगितले. मुंबई पोलिसांनी गुगलकडे ‘हॉटशॉट’च्या उत्पन्नाविषयी माहिती देण्याबाबत मागणी केल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
Raj kundra get money in lockdown too
महत्त्वाच्या बातम्या
- रमेश जारकीहोळी यांना खंडणी प्रकरणात अडकविण्यासाठी ब्लॅकमेल, एसआयटीच्या तपासात उघड
- Porn Film Case : राज कुंद्राला दिलासा नाहीच ; 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी-सहकारी रायन थॉर्पच्याही न्यायालयीन कोठडीत वाढ
- येडियुरप्पांची चॉईस बसवराज बोम्मई हे कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री
- वाढदिवस ठरला उद्धव ठाकरे यांच्या “राष्ट्रीय नेतृत्वा”च्या ब्रँडिंगचा दिवस…!!