• Download App
    पालघरच्या आदिवासी भगिनींनी बनविलेल्या आकाश कंदिलांनी यंदाही लखलखणार ‘राजभवन’'Raj Bhavan' will be lit by sky lanterns made by tribal sisters of Palghar

    पालघरच्या आदिवासी भगिनींनी बनविलेल्या आकाश कंदिलांनी यंदाही लखलखणार ‘राजभवन’

    प्रतिनिधी

    मुंबई : आदिवासी भागात सामाजिक, शैक्षणिक आणि रोजगार निर्मितीसाठी कार्यरत असणार्‍या पालघर जिल्हातील ‘विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटर’च्या आदिवासी भगिनींनी तयार केलेल्या पर्यावरण पूरक बांबूंच्या आकर्षक कंदीलांनी यंदाचे राजभवन पूर्णतः लखलखणार आहे. पालघर जिल्ह्यातील आदिवासी भगिनींनी बांबूपासून हे पर्यावरण-स्नेही आकाश कंदील तयार केले आहेत.‘सेवा विवेक’ (विवेक ग्रामविकास केंद्र) या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून हे पर्यावरण-स्नेही आकाश कंदील राजभवन येथे पाठविण्यात आले आहेत. गेल्या वर्षी देखील राजभवनाकडून येथील आकाश कंदील खरेदी करण्यात आले होते.’Raj Bhavan’ will be lit by sky lanterns made by tribal sisters of Palghar


    पोलीस बदली – पोस्टिंग रॅकेट प्रकरणात मुख्यमंत्र्यांना “बोलते” करा; भाजपच्या शिष्टमंडळाची राज्यपाल भगतसिंग कोशियारींकडे मागणी


    दिवाळीनिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवनातील कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना आदिवासी भगिनींनी तयार केलेले आकाश कंदील तसेच मिठाईचे वाटप केले. दिवाळीनिमित्त राजभवन परिसरात आज एका रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यपालांनी स्पर्धकांच्या कलाकृती पाहिल्या आणि विजेत्या स्पर्धकांचे कौतुक केले. यावेळी राजभवनात कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय तसेच पोलीस दलातील जवान उपस्थित होते. राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, विशेष सचिव राकेश नैथानी, उपसचिव श्वेता सिंघल व प्राची जांभेकर प्रामुख्याने उपस्थित होते.

    गेल्या अनेक वर्षापासून ‘विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटर’च्या माध्यमातून महिला सक्षमीकरणकरिता पालघर जिल्हातील वनवासी, गरजू महिलांना घरकाम सांभाळून आर्थिक हातभार लाभावा व त्यांना सन्मानजनक रोजगार प्राप्त व्हावा या हेतूने विवेक या संस्थेकडून पुढाकार घेत अशा महिलांना बांबू हस्तकलेचे मोफत प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यांचाकडून पर्यावरणपूरक बांबू हस्तकलेच्या बहुउपयोगी कित्येक वस्तू तयार केल्या जातात. यामध्ये बांबू हस्तकलेचा समावेश असून प्रशिक्षित महिला अनेक प्रकारची आकर्षक उत्पादने तयार करताना दिसतात.

    ‘Raj Bhavan’ will be lit by sky lanterns made by tribal sisters of Palghar

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!