• Download App
    ग्रामस्थांचे साथी हात बढाना : लॉकडाऊनमध्ये चक्क तलावाची निर्मिती ; वाशिम जिल्ह्यातील पांगरी महादेव गावाचा प्रेरक उपक्रम। Raising the hands of the villagers : Creation of pond in lockdown

    ग्रामस्थांचे साथी हात बढाना : लॉकडाऊनमध्ये चक्क तलावाची निर्मिती ; वाशिम जिल्ह्यातील पांगरी महादेव गावाचा प्रेरक उपक्रम

    वृत्तसंस्था

    वाशिम : लॉकडाऊनमध्ये काय करायचे असा प्रश्न अनेकांना पडतो. या वेळेचा चांगला उपयोग करून जलसंधारणाची कामे करता येतात. वाशिम जिल्ह्यातील पांगरी महादेव या गावात ग्रामस्थांनी चक्क तलावाची निर्मिती करून नवा आदर्श समाजासमोर घालून दिला आहे. Raising the hands of the villagers : Creation of pond in lockdown

    गावात पाणीसमस्या होती. पण, ती मार्गी लागली नाही. तरुण, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ एकत्र आले आणि त्यांनी तलाव बांधला.



    मंगरुळपीर तालुक्यातील पांगरी महादेव हे 800 लोकवस्तीचं गाव. सर्व शासकीय, प्रशासकीय योजनेपासून कोसो दूर आहे. अनेक वर्षांपासून समस्या घेऊन गाव लढत होतं. ना ग्रामपंचायत ना जिल्ह्यात गावाचा दर्जा. त्यामुळे शासकीय योजना या गावाच्या नशिबी कुठे? पांगरी महादेव गावात बाराही महिने पिण्याच्या पाण्याची समस्या होती.

    गावातील विष्णू मंजुळकर आणि सामाजिक कार्यकर्ते सचिन कुलकर्णी यांनी ग्रामसभा घेतली. पडिक जमिनीवर भव्य तलाव साकारण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यासाठी मोठा पैसा लागणार होता. अखेर वाशिमचे निवासी जिल्हाधिकारी शैलेश हिगे यांच्या पुढाकारातून 100 बाय 100 मीटरच्या तलाव निर्मितीला सुरुवात झाली.

    या तलाव निर्मितीच्या प्रशासनाने जेसीबी पुरवला तर गावकऱ्यांनी श्रमदान आणि आर्थिक मदत केली. तलावातील सुपीक माती काढून शेती सुपीक केली. तर पाणी गावाच्या कामी आणण्याचा निर्णय घेतला. प्रशासने आणि इतरांच्या मदतीने दहा लाख रुपये खर्च करुन भव्य तलाव निर्माण केला. त्यामुळे पाणी पातळी वाढून गाव दूषित पाण्यापासून दूर राहिल, अशी आशा विष्णू मंजुळकर यांनी व्यक्त केली.

    Raising the hands of the villagers : Creation of pond in lockdown

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ