• Download App
    Railway Recruitment 2021: रेल्वेमध्ये पॅरामेडिकल पदांवर भरती, 75 हजारांपर्यंत पगार, आजच करा अर्ज । Railway Recruitment 2021 for Paramedical Posts in Railways, Salary up to Rs 75,000, Apply Today

    Railway Recruitment 2021: रेल्वेमध्ये पॅरामेडिकल पदांवर भरती, ७५ हजारांपर्यंत पगार, आजच करा अर्ज

    Railway Recruitment 2021 : पश्चिम रेल्वेने मुंबई मध्यच्या जगजीवन राम पश्चिम रेल्वे रुग्णालयात मेडिकल प्रॅक्टिशनर्स आणि पॅरामेडिकल स्टाफच्या पदांवर भरतीसाठी अधिसूचना काढली आहे. इच्छुक उमेदवारांनी 06 एप्रिल 2021 पर्यंत वा त्याआधी निर्धारित प्रारूपात आपले अर्ज करायचे आहेत. एकूण 139 रिक्त पदांवर योग्य उमेदवारांची भरती होणार आहे. उमेदवारांची निवड टेलिफोनिक/ व्हाट्सअॅप इंटरव्‍यूच्या माध्यमातून केली जाईल. कोविड आयसोलेशन वॉर्डमध्ये फुलटाइम मेडिकल कॉन्‍ट्रॅक्‍ट (GDMO / स्पेशलिस्ट) वर उमेदवारांची भरती केली जाणार आहे. भरतीबाबत सविस्तर माहिती अधिसूचनेत आहे. Railway Recruitment 2021 for Paramedical Posts in Railways, Salary up to Rs 75,000, Apply Today


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : पश्चिम रेल्वेने मुंबई मध्यच्या जगजीवन राम पश्चिम रेल्वे रुग्णालयात मेडिकल प्रॅक्टिशनर्स आणि पॅरामेडिकल स्टाफच्या पदांवर भरतीसाठी अधिसूचना काढली आहे. इच्छुक उमेदवारांनी 06 एप्रिल 2021 पर्यंत वा त्याआधी निर्धारित प्रारूपात आपले अर्ज करायचे आहेत. एकूण 139 रिक्त पदांवर योग्य उमेदवारांची भरती होणार आहे. उमेदवारांची निवड टेलिफोनिक/ व्हाट्सअॅप इंटरव्‍यूच्या माध्यमातून केली जाईल. कोविड आयसोलेशन वॉर्डमध्ये फुलटाइम मेडिकल कॉन्‍ट्रॅक्‍ट (GDMO / स्पेशलिस्ट) वर उमेदवारांची भरती केली जाणार आहे. भरतीबाबत सविस्तर माहिती अधिसूचनेत आहे.

    पदांचे विवरण

    CMP-GDMO – 14 पदे
    नर्सिंग सुप्र‍िटेंडेंट – 59 पदे
    रेडिओग्राफर – 02 पदे
    रेनल रिप्‍लेसमेंट/ हिमोडायलिसिस टेक्‍निशियन – 01 पदे
    क्‍लीनिकल सायकोलॉजिस्‍ट – 02 पदे
    हॉस्पिटल अटेंडंट – 60 पदे

    महत्त्वाच्या तारखा

    ऑनलाइन अर्जांची सुरुवात – 03 एप्रिल 2021
    ऑनलाइन अर्जांची अंतिम मुदत – 06 एप्रिल 2021
    मुलाखतीची तारीख – 08 एप्रिल 2021

    या सर्व विविध पदांवर भरतीसाठी विविध शैक्षणिक पात्रतांची अट आहे. वयोमर्यादाही निर्धारित आहे. उमेदवारांनी सविस्तर माहितीसाठी अधिकृत अधिसूचना पाहावी. विशेष म्हणजे ऑनलाइन माध्यमातूनच अर्ज स्वीकारले जाणार आहेत. पोस्टाद्वारे पाठवलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. याशिवाय कोणत्याही उमेदवाराला वाहतूक खर्च दिला जाणार नाही. इतर सर्व माहिती नोटिफिकेशनमध्ये उपलब्ध आहे.

    अधिकृत नोटिफिकेशनसाठी येथे क्लिक करा.

    Railway Recruitment 2021 for Paramedical Posts in Railways, Salary up to Rs 75,000, Apply Today

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य