विशेष प्रतिनिधी
मुंबई : गणेशोत्सवानिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य, पश्चिम आणि कोकण रेल्वेवरून यंदा २६१ गणपती विशेष गाड्या चालवण्यात येत आहेत. गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत यंदा ५९ जादा गाड्या सोडण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून दिली. Railway provides extra trains for kokan
कोकणवासीयांचा गणेशोत्सव हा जिव्हाळ्याचा सण. त्यानिमित्त मुंबई, पुणे, ठाण्यातून अनेक चाकरमानी गणेशोत्सवानिमित्त कोकणची वाट धरतात. प्रवाशांचा सोयीसाठी रेल्वेकडून दरवर्षी जादा गाड्या सोडण्यात येतात. यंदा रेल्वेकडून २६१ गणपती विशेष गाड्या चालवल्या जात आहेत. त्यामध्ये मध्य रेल्वे २०१, पश्चिम रेल्वे ४२ आणि कोकण रेल्वेवरून १८ गाड्या चालवण्यात येत आहेत. गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत यंदा ५९ जादा सोडण्यात आल्या आहेत.
वाढती गर्दी लक्षात घेता काही गाड्यांमध्ये स्लीपर क्लासचे जादा डबे जोडण्यात आले आहेत. या गाड्यांसाठी विशेष तिकीट भाडे आकारले जात असल्याचेही रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
Railway provides extra trains for kokan
महत्त्वाच्या बातम्या
- नांदेड एक झलक होती, सरकार दखल घेत नसेल तर आम्हाला करायचं ते आम्ही करू शकतो, संभाजीराजे छत्रपती यांचा मुख्यमंत्र्यांना इशारा
- कापड उद्योगाला प्रोत्साहनासाठी केंद्र सरकार देणार १०,६३३ कोटी रुपयांचे अनुदान
- सुरक्षा समितीची (सीसीएस) महत्त्वपूर्ण बैठक : चीन-पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी मोदी सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
- खासदार सुभाष भामरे यांना जाणवला चिकुन गुनियाचा त्रास , वायू सेनेच्या विमानाने मुंबईला हलवले