वृत्तसंस्था
अलिबाग : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे सरकारने पर्यटनावरील निर्बंध सैल केल्यामुळे पर्यटक आता रायगडच्या समुद्र किनाऱ्यांकडे वळू लागले असून समुद्र किनारे पर्यटकांनी गजबजू लागले आहेत. त्यामुळे पर्यटनावर आधारित असलेले व्यवसाय आता हळूहळू बहरू लागले आहेत.Raigad’s beaches are bustling with tourists; Consecutive holidays, the result of loosening restrictions on tourism
रायगडमधील अलिबागसह नागाव, किहीम, काशीद, मुरुड इथल्या किनाऱ्यांवर पर्यटक दिसत आहेत. शनिवार, रविवार, सोमवार अशा सलग तीन दिवसांच्या सुट्यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने रायगडमध्ये दाखल झाले आहेत.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा परिणाम पर्यटन व्यवसायावर झाला. टपरीधारक , हॉटेल लॉजिंग मालक, घोडागाडी, उंटसवारी, वॉटरस्पोर्टसवर निर्बंधाचा मोठा परिणाम झाला आहे.आता कोरोनाचा प्रादुर्भाव खूपच कमी झाला असून रुग्णसंख्यादेखील आटोक्यात आली आहे. त्याबरोबरच पर्यटन व्यवसायावरील निर्बंध सैल करण्यात आले आहेत.
त्यामुळे पर्यटकांची पावले रायगडच्या समद्र किनाऱ्यांकडे वळली आहेत. पर्यटकांमध्ये प्रामुख्याने मुंबई आणि पुण्यातील पर्यटकांची संख्या अधिक आहे.अनेक महिन्यानंतर मोकळा श्वास घ्यायला मिळाल्याने पर्यटक खूश आहेत. बच्चे कंपनीदेखील आनंदली आहे. समुद्रात डुंबण्याबरोबरच खेळांचा आनंद घेत आहेत. अनेक कर्मचारी अजूनही वर्क फ्रॉम होम करीत आहेत.
पर्यटकांच्या आगमनाने व्यावसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. निर्बंधामुळे पर्यटनावर आधारित सर्व व्यवसाय ठप्प होते. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु हे व्यवसाय हळूहळू सुरू होत आहेत. त्यामुळे त्यांचीही रोजी रोटी सुरू झाली आहे.
Raigad’s beaches are bustling with tourists; Consecutive holidays, the result of loosening restrictions on tourism
महत्त्वाच्या बातम्या
- पाच हजार दहशतवाद्यांची काबूलच्या तुरुंगातून सुटका; तालिबानचे अफगाणिस्तावर वर्चस्व
- बिहारमध्ये गंगेचे रौद्र रूप धारण केल्याने हाहाकार, महापुराचा तीन लाख लोकांना फटका
- तालिबानच्या घुसखोरीनंतर अमेरिकन अधिकाऱ्यांची हेलिकॉप्टरने सुटका, भारतीयांनाही सुखरुप सोडवले
- डेक्कन क्वीनच्या शिरपेचात विस्टाडोममुळे मानाचा आणखी एक तुरा, निसर्गरम्य सौंदर्य अनुभवल्याने प्रवासी सुखावले