• Download App
    चिंचवड पोटनिवडणुकीत बंडखोर उमेदवार राहुल कलाटेंचे डिपॉझिट जप्त Rahul Kalates deposit seized in Chinchwad by election

    चिंचवड पोटनिवडणुकीत बंडखोर उमेदवार राहुल कलाटेंचे डिपॉझिट जप्त

    कसबा मतदारसंघात १४ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होणार

    प्रतिनिधी 

    Rahul kalate  Deposit  : पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे या ठिकाणी पोटनिवडणूक झाली. भाजपाने या ठिकाणी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांची पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली होती आणि ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असं आवाहन केलं होतं. मात्र तरीही महाविकास आघाडीने आपल्या उमेदवाराला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. अखेर मतदारांनी भाजपाच्या बाजूने कौल देत अश्विनी जगताप यांना भरघोस मतांनी विजयी केलं आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पराभवाला सामोरं जावं लागलं. Rahul Kalates deposit seized in Chinchwad by election


    चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाच्या अश्विनी जगताप यांचा दणदणीत विजय


    महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या पराभवासाठी कारणीभूत ठरलेले बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांना ४४ हजारांहून अधिक मतं मिळाली, मात्र त्यांना स्वत:चं डिपॉझिट वाचवता आले नाही. विशेष म्हणजे निवडणुकीअगोदर एक लाखांहून अधिक लोकांचं मत माझ्या पाठीशी असल्याचा दावा त्यांनी केला होता. मात्र प्रत्यक्षात त्यांना ४४ हजार ११२ मतं मिळाली. तर डिपॉझिट राखण्यासाठी त्यांना ४७ हजार ८३३ मतांची आवश्यकता होती.

    चिंचवड पोटनिवडणुकीसाठी एकूण २८ उमेदवार रिंगणात होते, यापैकी केवळ भाजपाच्या अश्विनी जगताप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे यांच्या व्यतिरिक्त सर्व उमेदवारांना आपले डिपॉझिट गमावावे लागले.

    मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून अश्विनी जगताप या आघाडीवर होत्या. मतमोजणीच्या ३७ फेऱ्या पार पडल्यानंतर अश्विनी जगताप यांना १ लाख ३५ हजार ६०३ मतं मिळाली होती. तर महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांना ९९ हजार ४३५ मतं मिळाली. याशिवाय महाविकास आघाडीचे बंडखोर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना ४४ हजार ११२ मते मिळाली. अश्विनी जगताप यांचा ३६ हजार १६८ मतांच्या फरकाने विजय झाला.

    कसबा मतदारसंघात १४ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होणार आहे. या ठिकाणी डिपॉझिट वाचवण्यासाठी २३ हजार मतांची आवश्यकता होती.

    Rahul Kalates deposit seized in Chinchwad by election

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस