विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली / मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमानाचा मुद्दा देशात महाराष्ट्रात तापला असून अखेर काँग्रेसला मागे ढकलण्यात भाजप – सेना यशस्वी ठरल्याचेच दिसत आहे. कारण सावरकरांच्या मुद्द्यावर त्यांचे समर्थन करून शरद पवारांना मध्यस्थी करावी लागली आहे. मल्लिकार्जुन खर्गे यांनी बोलावलेल्या 18 पक्षांच्या बैठकीत शरद पवारांनी सावरकरांच्या मुद्द्यावर परखड भाष्य केल्याची माहिती संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत दिली. BJP Shivsena pressed back Congress over savarkar insult issue, sharad Pawar had to mediate to save MVA
सावरकर महान स्वातंत्र्यवीर होते. त्यांना माफीवीर म्हणणे योग्य नाही. त्यांचा आणि संघाचा काही संबंध नाही. ते विज्ञानवादी होते त्यांचे हिंदुत्व विज्ञाननिष्ठ होते त्यांची सामाजिक भूमिका ही समजावून घेतली पाहिजे. सावरकरांचा मुद्दा हा महाविकास आघाडीत मतभेदाचा किंवा फुटीचा ठरू नये त्यापेक्षा अधिक महत्त्वाचे मुद्दे आपल्यासमोर आहेत. त्यावर चर्चा करावी, अशी भूमिका शरद पवारांनी मांडली आणि त्यावर बहुतेक विरोधी पक्षांनी सहमती दर्शवली. आपलीही राहुल गांधींच्या आज दिवसभरात चर्चा होईल इथून पुढे काँग्रेस नेते ते सावरकर वाचायला घेतील अशी माहिती संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेत बाकी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजप यांच्यावर शरसंधान होते. शेंडी जानव्याचे हिंदुत्व हा शब्दही होता. पण त्यांच्या पत्रकार परिषदेतले “बिटवीन द लाईन्स” हेच होते, की सावरकरांच्या अपमानाच्या मुद्द्यावर काँग्रेसला मागे ढकलण्यात भाजप – सेना यशस्वी ठरली आणि अखेर शरद पवारांना सावरकरांची महती गाऊन महाविकास आघाडीत बिघाडी होऊ नये म्हणून या मुद्द्यावर सर्व विरोधी पक्षांच्या बैठकी मध्यस्थी करावी लागली.
पण पवारांनी केलेली ही मध्यस्थी आणि सावरकरांच्या महानते विषयी मांडलेला मुद्दा काँग्रेसला किती रुचला आहे आणि राहुल गांधी यांना मनापासून किती पसंत पडला आहे, हे प्रश्न अद्याप कायम आहेत. त्यामुळे शरद पवारांनी मध्यस्थी केली असली तरी राहुल गांधी यांच्या मध्यस्थीनुसारच वागतील आणि भविष्यकाळात सावरकर मुद्द्यावर बोलण्याचे टाळतील, ती किती शक्यता आहे??, याविषयी शंका आहे.
BJP Shivsena pressed back Congress over savarkar insult issue, sharad Pawar had to mediate to save MVA
महत्वाच्या बातम्या
- अभिमानापस्पद! भारतातील पहिले क्लोन वासरू, कर्नालच्या NDRI संस्थेच्या शास्त्रज्ञांची कमाल
- US School Shooting : अमेरिकेतील शाळेत गोळीबार, तीन विद्यार्थ्यांसह सात जणांचा मृत्यू
- भारतीय नारी जगात भारी…! महिला वैमानिकांच्या संख्येत भारत जगात अव्वल
- Amruta Fadnavis bribe blackmail case : ‘बुकी’ अनिल जयसिंघानी याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी