विेशेष प्रतिनिधी
पुणे : शिवसेना नेते रघुनाथ कुचिक बलात्कार प्रकरणाला वेगळाच ट्विस्ट आला आहे. जी पीडित तरुणी बेपत्ता झाल्याचे सांगण्यात येत होते, ती कॅमेरासमोर आली असून तिने शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यावर त्यांनी मदत न केल्याचा गंभीर आरोप केला आहे. Raghunath Kuchik rape case “twist”: The victim said in front of the camera, Sanjay Raut, Neelam Gorhe did not help !!
रघुनाथ कुचिकविषयी वारंवार तक्रार करूनही आपल्याला संजय राऊत, आणि नीलम गोऱ्हे यांनी मदत केली नाही. त्यांच्याकडे सर्वात आधी मदत मागितली होती, पण कोणीही मदत केली नाही असा आरोप या तरुणीने एबीपी माझाच्या कॅमेरा समोर केला आहे. महिला आयोग आणि पोलिसांनी मदत न केल्यामुळेच आपण चित्रा वाघ यांच्याकडे गेलो, असेही तिने म्हटले आहे.
ती तरुणी म्हणाली – सर्वात प्रथम मी नीलम गोऱ्हे यांना फोन केला होता. रघुनाथ कुचिकवर गुन्हा दाखल करण्याआधी मी त्यांच्याशी संपर्क साधला होता. मी त्यांना खूप फोन केले, पण त्यांनी उचलले नाही. मग नंतर मी संजय राऊतांना फोन केला होता.
-संजय राऊतांनी पहिल्या वेळी फोन उचचला नाही, पण दुसऱ्या वेळी उचलला. यावेळी त्यांना मी तुमच्या पक्षातील या व्यक्तीने मला फसवले असून लैंगिक अत्याचार करत गर्भपात करायला लावल्याचे त्यांना सांगितले. त्यांनी मला नीलम गोऱ्हेंशी संपर्क करण्यास सांगितले. त्यावेळी मी त्यांना सांगितलं की, त्यांना अनेकदा फोन केले. पण त्या उचलत नाहीत. मग त्यांनी मी त्यांना फोन करतो आणि तुमचा नंबर देत संपर्क करायला लावतो असे सांगितले. त्यानंतर १०-१५ मिनिटांत नीलम गोऱ्हेंच्या पीएचा फोन आला आणि त्यांनी मला बंगल्यावर बोलावून घेतले.
-नीलम गोऱ्हेंनी रघुनाथ कुचिकचा माझ्याशी संवाद काय झाला, या बद्दल विचारणा केली. यावेळी त्यांनी स्त्री आधार केंद्राचा फॉर्म भरुन घेतला. पण त्यानंतर त्यांनी परत कधी मला फोनही केला नाही आणि विचारणाही केली नाही. संजय राऊतांनीही परत फोन केला नाही. -संजय राऊत आणि नीलम गोऱ्हे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर मला त्यांनी मदत केली नाही म्हणून मी चित्रा वाघ यांच्याशी संपर्क साधला.
Raghunath Kuchik rape case “twist”: The victim said in front of the camera, Sanjay Raut, Neelam Gorhe did not help !!
महत्त्वाच्या बातम्या
- बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पावसाळी वातावरण; गारठा, उष्मा देखील वाढला
- कोव्हिशिल्डचा दुसरा डोस केव्हा घ्यावा ? राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाची शिफारस
- AAP Rajya Sabha : हरभजन सिंगला आमदार आदमी पार्टी पंजाबातून राज्यसभेवर पाठवणार!!
- युक्रेनने फेटाळला आत्मसमर्पणाचा प्रस्ताव; राजधानी कीव्हवर रशियाकडून हवाई हल्ले सुरु