प्रतिनिधी
मुंबई : राज्यपालांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आज रविवारी 3 जुलै रोजी राहुल नार्वेकर यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी बहुमताने निवड झाली. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचा उल्लेख आदिवासी म्हणून केल्यामुळे भाजपाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी टीका केली. Racism in Jayant Patil’s head; Sharsandhan of Gopichand Padalkar
राष्ट्रवादीची परंपरा
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याविषयी जे बोलले त्यावरून त्यांची सत्ता गेली तरी त्यांचा माज गेला नाही.
त्यांचा माजुर्डेपणा जायला तयार नाही. सभागृहात चर्चा करत असताना उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी गेल्या अडीच वर्षांत खूप चांगले काम केले आहे. हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. पण त्यांचा उल्लेख करताना जयंत पाटील यांनी त्यांच्या समाजाचा उल्लेख केला आहे. यावरून त्यांच्या डोक्यातून अजून जातीवाद जायला तयार नाही, हेच दिसते, अशी टीका पडळकर यांनी केली
आदिवासी समाज असेल, मागासवर्गीय समाज असेल, भटक्या विमुक्त समाज असेल, या समाजातून कोणी लोकप्रतिनिधी चांगले काम करत असेल, तरी त्या लोकांचा अपमान करणे, त्या लोकांच्या समाजाबद्दल बोलणे, अशी परंपरा या राष्ट्रवादीवाल्यांनी चालू ठेवली आहे. त्यामुळे जयंत पाटील यांचा जाहीर निषेध आहे. आम्हीच या राज्यात चांगले काम करू शकतो असे जे चित्र, बुडबुडा त्यांनी निर्माण केला आहे, ते लवकरच फुटल्याशिवाय राहणार नाही, असे टीकास्त्रही पडळकर यांनी सोडले.
Racism in Jayant Patil’s head; Sharsandhan of Gopichand Padalkar
महत्वाच्या बातम्या
- Nupur Shrama Row : नुपूर शर्माविरोधात कोलकाता पोलिसांनी जारी केली लुकआउट नोटीस, जाणून घ्या, कोणत्या राज्यांत दाखल आहेत गुन्हे?
- Pakistan Blasphemy : पाकिस्तानमधील सॅमसंग कंपनीवर ईशनिंदेचा आरोप; प्रचंड गोंधळ, 27 कर्मचारी ताब्यात
- अमरावती हत्याकांड : मुख्य आरोपीच्या नागपुरातून आवळल्या मुसक्या, पोलिसांनी आठ दिवस झाकून ठेवले कारण
- द फोकस एक्सप्लेनर : शिंदेसेना की उद्धवसेना? कोणाचा व्हीप वैध? काय होणार परिणाम? कायदेशीर अडचण काय? वाचा सविस्तर