वृत्तसंस्था
पुणे : राज्यात आजपासून अनलॉक सुरू होत आहे. त्यामुळे त्यात लोकलसेवेचा समावेश करावा, अशी मागणी पुणेकर प्रवाशातून होत आहे. दरम्यान, एसटी, पीएमपीला परवानगी आहे, मग लोकल का नाही ? असा प्रश्न सामान्य प्रवाशांना पडला आहे. Punekars waiting for Local to start; ST, PMP allowed then why not local?
गेल्या आठ महिन्यांपासून पुणे-लोणावळा लोकल तसेच पुणे-दौंड शटल (डेमू) या दोन्ही सेवा अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच उपलब्ध आहेत. सामान्य प्रवाशांना आता या सेवेचा लाभ मिळावा, अशी मागणी होत आहे.
राज्य सरकारने अनलॉकबाबत स्थानिक प्रशासनाला परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत. पुण्यात आजपासून सर्व दुकाने सुरू होत आहेत. एसटी आणि पीएमपी सेवा सुरू होत असताना लोकल सेवादेखील पूर्ववत व्हावी अशी मागणी होत आहे.
पुणे-लोणावळा लोकलमधून रोज सरासरी ५० ते ६० हजार प्रवासी प्रवास करतात. तर दिवसाभरात ४० ते ५० फेऱ्या होतात. सध्या अत्यावश्यक सेवे अंतर्गत चार फेऱ्या होत आहेत. पुणे-लोणावळा लोकल व पुणे-दौंड शटल सेवा सुरू झाल्यावर पुणेकरांची मोठी सोय होणार आहे.
Punekars waiting for Local to start; ST, PMP allowed then why not local?
महत्त्वाच्या बातम्या
- राज्यामध्ये मॉन्सूनचे जोरदार आगमन : नऊ जिल्ह्यांत शिडकाव्याने वातावरणात गारवा
- स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका कोण साकारणार? लंडन, अंदमान आणि महाराष्ट्रामध्ये होणार चित्रीकरण
- ब्रिटनचे शाही जोडपे प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कला कन्यारत्न
- भज्जी तू सुध्दा खलिस्थानवादी! क्रिकेटपटू हरभजनसिंगने केला जर्नलसिंग भिद्रानावलेचा गौरव, शहीद म्हणून केला प्रणाम
- पश्चिम बंगालमध्ये आणखी एका भाजपा कार्यकर्त्याचा मृत्यू, बॉम्ब फेकून केली हत्या
- नात्याला काळिमा, मुलाने केला वृध्द आईवर बलात्कार