वारजे परिसरात वनविभागाच्या जागेवर हे उद्यान साकारणार आहेत.सकाळी सात वाजता अजित पवार कार्यक्रमस्थळी हजर झाले.यावेळी त्यांनी पुणेकरांच्या स्वभावाच वर्णन करताना जोरदार विनोदात्मक फटकेबाजी केली आहे.Punekars did not leave out the gods while naming, Sotya Mhasoba, Upashi Vithoba to Bhikardas Maruti, Ajit Pawar’s humorous shots.
विशेष प्रतिनिधी
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोना आढावा बैठकीसाठी आज पुणे दौर्यावर आहेत.पुण्याविषयी बोलत असतांना पवार म्हणाले की ,’पुणे तिथे काय उणे असे म्हटले जाते , ते खरे आहे.पुण्याच्या पाट्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरल्या आहेत.
अजित पवारांच्या हस्ते आज संजीवन उद्यानाचा भूमीपूजन सोहळा संपन्न
उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोना आढावा बैठकीसाठी आज पुणे दौर्यावर आहेत.सकाळी त्यांच्या हस्ते पुण्यात संजीवन उद्यानाचा भूमीपूजन सोहळा पार पाडला.वारजे परिसरात वनविभागाच्या जागेवर हे उद्यान साकारणार आहेत.सकाळी सात वाजता अजित पवार कार्यक्रमस्थळी हजर झाले.यावेळी त्यांनी पुणेकरांच्या स्वभावाच वर्णन करताना जोरदार विनोदात्मक फटकेबाजी केली आहे.
अगदी सातच्या कार्यक्रमाला अजित पवार दहा मिनिटे अगोदर उपस्थित राहिले.
पुणेकरांनी देवालाही नाय सोडल!
पुणेकरांनी आपल्या देवांना आणि मंदिरांना एकापेक्षा एक भन्नाट नावं ठेवली आहेत. ही नावं दुसऱ्या कुठल्या शहरात असती तर त्याची एवढी चर्चा झाली नसती, पण पुण्याची बातच न्यारी आहेअजित पवार म्हणाले पुणेकरांनी नाव ठेवताना देवांनाही सोडल नाही.अस म्हणत त्यांनी पुण्यातील सोट्या म्हसोबा , पासोड्या मारुती,उपाशी विठोबा, भिकारदास मारुती, ताडीवाला दत्त, डुल्या मारुती,जिलब्या मारुती,अशी देवांची नावे सांगितली.पुढे टोला लगावत पवार म्हणाले ‘जे सूर्यमुखी असतील ते मला शिव्या देत असतील’, असं म्हटलं. तर मला सकाळी सकाळी कार्यक्रम घ्यायला आवडतो, असंही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितलं.
पुणेकरांचा हात कुणीच धरु शकत नाही!
आपल्याला पुणेरी पाट्यांबद्दल नेहमीच सर्वांना कुतुहल असते आणि त्याची चर्चा सर्वत्र पाहण्यास मिळते. त्यामुळे खरोखरच पुणेकरांचा हात कुणी धरू शकत नाही. ज्या भागात आज भूमिपूजन होत आहे, या भागाला डुक्कर खिंड असे म्हटले जाते. या भागात काही वर्षांपूर्वी रानडुकरांचा वावर जास्त असल्यामुळे असे नाव पडले असेही त्यांनी सांगितले.
अजित पवारांचं भाजपच्या बक्षीसाला उत्तर
महाविकास आघाडी सरकारने काय केलं ते दाखवा, असं बक्षीस भाजपकडून जाहीर करण्यात आलं, मात्र आढावा बैठकीत आम्ही या अनेक विकासकामांचा आढावा घेत असतो. पुण्यातील विकास कामांना निधी देण्याचं काम केलं, मेट्रोचा हप्ता थकायला नको म्हणून प्रयत्न करतोय, असं म्हणत त्यांनी पुणे शहराचे भाजपाध्यक्ष जगदीश मुळीक यांना उत्तर दिलं.
Punekars did not leave out the gods while naming, Sotya Mhasoba, Upashi Vithoba to Bhikardas Maruti, Ajit Pawar’s humorous shots.
महत्वाच्या बातम्या
- पाकिस्तानी भगिनीने पीएम मोदींना पाठवली राखी, भेटण्याचीही व्यक्त केली इच्छा
- काबूल गुरुद्वारा समितीसोबत तालिबानची बैठक, म्हणाले – हिंदू – शीखांना त्रास दिला जाणार नाही
- अमेरिका: संसदेबाहेर सापडला स्फोटकांनी भरलेला ट्रक , पोलिस सतर्क , इमारती रिकाम्या करण्यात आल्या
- ‘हमारा झंडा, हमारी पहचान’ तालिबानच्या विरोधात घोषणा, काबुलसह अनेक शहरात निदर्शने; तालिबानच्या झेंड्याच्या केल्या चिंध्या