वृत्तसंस्था
पुणे : पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आल्यामुळे निर्बंध हटविले आहेत. आजपासून पुणेकरांना आणखी मोकळा श्वास घेता येणार आहे. पुण्यात आजपासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत दुकानं सुरू राहणार आहे तर हॉटेल्स, बार आणि रेस्टरंट रात्री 10 वाजेपर्यंत खुली राहतील. Punekar to breathe freely from today; All shops will be open until 7 p.m.
नव्या नियमावलीनुसार, सर्व दुकाने सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत खुली राहतील. हॉटेल सकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत सुरू राहतील आणि पार्सलसेवा रात्री 11 पर्यंत सुरू असेल.
मॉल्स, थिएटर्स, नाट्यगृह पन्नास टक्के क्षमतेने खुली राहणार आहेत. तसंच इतर दुकांनाच्या वेळेतही संध्याकाळी 7 वाजेपर्यंत वाढ केली आहे.
हॉटेल्स बार, रेस्टारंट रात्री 10 पर्यंत खुली राहणार आहेत. पण, पन्नास टक्के क्षमतेनं परवानगी आहे. वाचनालये, क्लास सुरू होणार आहेत. उद्याने आणि स्पोर्ट्स देखील दोन वेळा खुली ठेवण्यास परवानगी दिली आहे.
शनिवारी ,रविवारी अन्य दुकाने बंद
अत्यावश्यक सुविधा वगळता इतर दुकाने शनिवारी ,रविवारी मात्र बंद राहणार आहे. अत्यावश्यक सुविधा वगळता इतर दुकाने आणि हॉटेल्सच्या या विकेंड लॉकडाऊन बाबत पुढील शुक्रवारी 18 जून रोजी आढावा घेतला जाणार आहे, त्यानंतर पुढील सूचना दिली जाईल.
शहरात संचारबंदी रात्री 10 पासून सुरू
उद्याने सकाळी 5 ते 9 आणि संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत खुली राहणार आहे. स्पोर्ट्स, क्रीडांगणे देखील सकाळी 5 ते 9 संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत खुली राहणार आहे. तसंच अभ्यासिका, वाचनालये 50 टक्के क्षमतेने संध्याकाळी 7 पर्यंत सुरू राहणार आहेत.
कार्यक्रमावर निर्बंध
राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी निर्बंध घालून देण्यात आले आहे. 50 लोकांच्या उपस्थितीत 7 वाजेपर्यंत कार्यक्रम आयोजित करायला परवानगी मिळाली आहे.
येथे ई-पास आवश्यक
लेव्हल 5 असलेल्या ठिकाणी जायचं तर ई-पास आवश्यक असणार आहे. शासकीय कार्यालये 100 टक्के क्षमतेने सुरू झाली आहे. खाजगी कार्यालये मात्र 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील.
Punekar to breathe freely from today; All shops will be open until 7 p.m.
महत्वाच्या बातम्या
- चीनी ड्रॅगनच्या महत्वाकांक्षांना रोखण्यासाठी अतिश्रीमंत देश आले एकत्र
- पाचगणी पर्यटकांनी फुलले, पर्यटकांच्या गर्दीने टेबललॅण्डकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी
- आशा कर्मचार्यांची निराशा ! फुटकी कवडीही न देता ठाकरे सरकार नुसतेच गातात गोडवे ;१२ तास काम-आशा कर्मचारी वेठबिगार ; ७० हजार ‘आशांचा’ बेमुदत संप
- PM MODI PLEASE HELP : राजकीय एजंट्स पासून धोका-महाराष्ट्र सोडून कायमचा दिल्लीला ; ठाण्याच्या वन रुपी क्लिनिकचे संस्थापक डॉ. राहुल घुलेंचे खळबळजनक ट्विट
- हाँगकाँग, झिजियांग प्रातांमधील मानवाधिकाराच्या हननावरून जी – ७ आणि मित्र देशांनी चीनला फटकारले
- अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांचा चीनविरोधात आव आक्रमक; भाषा गुळमुळीत!!
- चीनच्या महत्त्वाकांक्षी बेल्ट अँड रोड प्रकल्पाला लोकशाही पर्यायी प्रकल्प देण्याचे जी – ७ देशांचे सूतोवाच
- Electric Vehicle : इलेक्ट्रिक दुचाकी आता होणार स्वस्त; केंद्र सरकारने अनुदानाची रक्कम वाढविली